विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने पुणे – नाशिक महामार्गासाठी मोठी घोषणा केली असून केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते खेड अर्थात राजगुरुनगरसाठी 30 किलोमीटर लांबीच्या 8 – लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. या कॉरिडॉरसाठी केंद्र सरकारने 7,827 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. केंद्रीय महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती दिली. हा कॉरिडॉर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण यांसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडला जाईल.
एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून निघणाऱ्या/जाणाऱ्या वाहतुकीसाठी हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी तयार करेल. या कॉरिडॉरमुळे पिंपरी – चिंचवडच्या आसपासची वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. पिंपरी – नाशिक फाटा ते खेड या दोन्ही बाजूंच्या 2 लेन सर्व्हिस रोडसह सध्याच्या रस्त्याचे 4/6 लेनमध्ये अपग्रेड केले जातील. याशिवाय 8 लेनचा उड्डाणपूल तयार केला जाईल.
नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 7,827 कोटी रुपये किंमतीच्या आणि 30 किलोमीटर लांबीच्या, 8 – लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा – खेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडॉर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण यांसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल, ज्यामुळे या भागाची लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
या प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल. यामुळे या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक्स क्षमता वाढेल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होईल. हा कॉरिडॉर मेगा फूड पार्क, टेक्सटाईल क्लस्टर्स, SEZ, फार्मा आणि मेडिकल क्लस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्रासह 10 आर्थिक नोड्सना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, ज्यामध्ये 9 जंक्शन्स आणि सुलभ वाहतूकीसाठी दोन मोठे पूल समाविष्ट आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App