Pune Money Laundering Case : ईडीकडून पुणे, बारामतीत धाडसत्र, मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई; 19.50 लाखांसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त

Pune Money Laundering Case

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकांपूर्वी काही दिवस अगोदर कमी झालेल्या ईडीच्या धाडी पुन्हा सुरू झाल्याचं दिसून येत आहे. कारण ईडीने मनी लाँड्रींगप्रकरणी (Money Laundering Case )महाराष्ट्रातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मुंबई, कर्जत, बारामती आणि पुण्यात ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, ईडीकडून मनी लाँड्रींग प्रकरणी पुण्याच्या एम. एस. शिव पार्वती साखर कारखाना आणि इतर कंपन्यांच्या खात्यात पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. एम/एस. हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि. आणि त्यांचे व्यवस्थापक नंदकुमार तासगांवकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगवाले यांच्या बँक लोन फसवणूक प्रकरणी हे अभियान राबवण्यात आल्याचे सांगितले आहे.



19.50 लाख रुपये केले जप्त ईडीच्या या छापेमारीत अनेक संशयास्पद कागदपत्र डिजिटल पुरावे आणि 19.50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने या प्रकरणात सर्व प्रथम गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने पुढे तपास सुरू केला आहे. या कंपन्यांनी 100 कोटीचं कर्ज घेतलं होतं. मात्र, कर्ज मिळवण्याच्या अटीनुसार प्रकल्पासाठी 71 कोटी रुपये दिले नाहीत, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, कर्ज स्वरुपात घेतलेली रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. त्यानुसार ईडीकडून पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, कंपनीच्या व्यवस्थापकाने आणि सहायक कंपन्यांनी, जसं की एम/एस तासगांवकर कंस्ट्रक्शन लिमिटेड; एम/एस तासगांवकर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांची सहयोगी एम/एस हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून कर्जाच्या रक्कमचा मोठा हिस्सा हडप केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीतून सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झालं असून त्यांनी व्यक्तिगत लाभ मिळवला आहे. याप्रकरणी, सीबीआयसह आता ईडीकडून पुढील तपासणी सुरू आहे.

पवारांच्या कंपनीसोबत जोडलंय नाव

हायटेक इंजिनीअरिंग कंपनीची सहकारी कंपनी म्हणून तासगावकर कंस्ट्रक्शन काम करत असल्याचा ईडीचा दावा आहे. रोहित पवार यांच्या बारामती अग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत हायटेक इंजिनीअरिंग कंपनीचे नाव आले होते. या लिलाव प्रक्रियेत रोहित पवार यांनी हायटेक इंजिनीअरिंग कंपनीची मदत घेतल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात येत होता.

Pune Money Laundering Case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात