विशेष प्रतिनिधी
बारामती : महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते म्हणून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न मार्गी लाववायचे सोडून देऊन विरोधी पक्षांना काहीही सल्ले देऊन आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, अशा परखड शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी आज बारामतीतून थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. Chagan bhujbal directly targets sharad pawar over maratha and OBC reservation issue from baramati
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मेळावा घेतला. यात छगन भुजबळांनी थेट शरद पवारांचे नाव घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते महाराष्ट्र पेटवत असल्याचा गंभीर आरोप केला.
छगन भुजबळांच्या भाषणानंतर जमावातून एक मराठा, लाख मराठा या घोषणा ऐकू आल्या.
छगन भुजबळ म्हणाले :
आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल, पण ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे?? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत.
आरक्षणाचा वाद मिटावा म्हणून सह्याद्री भवनावर राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती. विरोधी पक्षातले नेते येणं क्रमप्राप्त होतं. आम्ही विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड या सगळ्यांना सांगितलं होतं. शरद पवारांनाही या बैठकीला बोलवा हे सांगितलं होतं. व्ही. पी. सिंग यांनी जे आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी शरद पवारांनी केली म्हणून आम्ही आजवर त्यांचे आभारही मानले. मात्र ज्यावेळी आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत असतात तेव्हा अपेक्षा हीच असते की शरद पवारांनी बैठकीला यायला हवं होतं. पण ते आले नाहीत.
उलट विरोधी पक्षातल्या नेत्यांना काहीतरी सल्ले द्यायचे. त्यानंतर पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे. आम्ही सगळ्या विरोधी पक्षांना सांगतो आहे की सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम बहिष्कार टाकायचा, मुद्दाम तिथे यायचं नाही हे योग्य नाही. निवडणूक असेल तेव्हा तुमचे झेंडे हाती घ्या, तुमचे मुद्दे मांडा. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, आमचे झेंडे हाती घेतो.
मात्र सामजिक प्रश्नी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे अजिबात योग्य नाही. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजाचे लोक आहेत. सगळे आमचे आहेत आणि तुमचेही आहेत. एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुबुद्धी देओ!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App