2031पर्यंत भारत होणार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; RBI डेप्युटी गव्हर्नर यांनी व्यक्त केला विश्वास

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताला जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी 2048 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, तर 2031 मध्येच देशाला ही कामगिरी करता येईल. त्याच वेळी देशामध्ये 2060 पर्यंत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता आहे.India to become world’s second largest economy by 2031; RBI Deputy Governor expressed confidence

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी 9 जुलै रोजी लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन येथे दिलेल्या भाषणात ही माहिती दिली. ते म्हणाले- महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्याचा दृढनिश्चय पाहता, भारत पुढील दशकात पुढे जाईल याची कल्पना करता येते.



भारत दरवर्षी 9.6% आर्थिक वाढीसह विकसित देश बनू शकतो

पात्रा म्हणाले की, पुढील 10 वर्षांत भारताचा आर्थिक विकास दर वर्षी 9.6% दराने झाला, तर निम्न मध्यमवर्ग उत्पन्नाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकतो आणि विकसित देश बनू शकतो. त्याचा परिणाम दरडोई उत्पन्नावरही दिसायला हवा.

मॅक्रो आर्थिक धोरण आणि आर्थिक स्थिरता सकारात्मक मार्गावर

डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा म्हणाले की, भारतीय रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी आणि आर्थिक स्थैर्यदेखील सकारात्मक मार्गावर आहे.

भारतातील महागाई दर जागतिक चलनवाढीच्या दराशी सुसंगत आणण्याची गरज आहे, जेणेकरून रुपयाचे अंतर्गत आणि बाह्य मूल्य टिकवून ठेवता येईल. यामुळे रुपयासाठी आंतरराष्ट्रीयीकरणाचे मैदान तयार होईल आणि भारत भविष्यात जगातील आर्थिक शक्तिस्थान म्हणून उदयास येऊ शकेल.

India to become world’s second largest economy by 2031; RBI Deputy Governor expressed confidence

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात