विशेष प्रतिनिधी
भोपाळ : गेले कित्येक वर्षे फक्त भाजपचे राजवट असलेल्या मध्य प्रदेशातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशात 1700 पेक्षा अधिक मदरशांमध्ये अत्यंत खस्ता हालत असताना तिथे मुलांना इस्लामिक धार्मिक शिक्षण दिले जाते, पण त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या मदरशांमध्ये तब्बल 9,417 हिंदू मुले शिकत आहेत. या मुद्द्यावर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अर्थात NCPCR अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सरकारला फटकारले आहे. 9,417 Hindu children study in madrasas of MP, NCPCR raises questions. Why Hindu children in madrasas?
मध्य प्रदेश मदरसा अधिनियम अंतर्गत काही माहिती राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मागविली होती. त्या माहितीतूनच ही धक्कादायक बाब समोर आली की, तिथे तब्बल 9,417 हिंदू मुले इस्लामचे धार्मिक शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रियांक कानूनगो यांनी या हिंदू मुलांची व्यवस्था ताबडतोब सर्वसामान्य शाळांमध्ये करण्याचे आदेश मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत.
या मदरशांमध्ये प्राथमिक सुविधा देखील नाहीत तिथे मुलांचे शिक्षण होऊच कसे काय शकते असा सवाल प्रियांक कानूनगो यांनी केला.
या संदर्भातली धक्कादायक माहिती समोर आल्याबरोबर मध्य प्रदेश काँग्रेसला जाग आली आणि पक्षाच्या नेत्यांनी मदरशांमध्ये हिंदू मुलांनी शिक्षण घेतले म्हणून काय बिघडले, असा तथाकथित धर्मनिरपेक्ष सवाल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App