रोहिंग्या, बांगलादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत अनेक मतदारसंघांमध्ये एकगठ्ठा मतदान झाले. त्याचा फटका महायुतीला बसला त्यानंतर मुंबईतल्या बेकायदा बसल्या आणि त्यामध्ये राहणारे रोहिंग्या आणि बांगलादेशी यांचा विषय ऐरणीवर आला असून मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्या मुद्द्यावर नेमकेपणाने बोट ठेवले. भाजपच्या प्रादेशिक बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.The Rohingya will not rest until the Bangladeshis are sent back; Testimony of Minister Mangal Prabhat Lodha



मुंबईतील वाढत्या रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे फक्त पोलिसांची नाही, तर आपल्या समाजाची देखील डोकेदुखी वाढली आहे. वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार इतकच नाही, तर त्यांनी या वेळी मतदान देखील केले. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे कि, त्यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीची पुन्हा तपासणी करावी आणि त्यामधील रोहिंग्या किंवा बांग्लादेशी नागरिकांची नावे काढून टाकावी. ATS अतिशय चांगल्या रीतीने त्यांची धरपकड करत आहे आणि त्यांना परत पाठवत आहे. आम्ही मुंबई उपनगरात यासाठी एक विशेष टीम सुद्धा गठीत केलेली आहे. जोपर्यंत रोहिंग्या बांगलादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

अनधिकृतरित्या कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकांच्या हक्काच्या सुविधा घुसखोरांना मिळत असल्याने आज कठोर कायद्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री या बाबतीत सजग असून, त्यावर योग्य कार्यवाही होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

The Rohingya will not rest until the Bangladeshis are sent back; Testimony of Minister Mangal Prabhat Lodha

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात