विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असताना काश्मीरच्या आजादीची वकिली केल्याबद्दल अर्बन नक्षल अरुंधती रॉय यांच्यावर UAPA कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी अरुंधती रॉय यांच्यावर UAPA कायद्या अंतर्गत खटला चालवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे देशातल्या लिबरल गॅंग मध्ये खळबळ माजली आहे. त्यांनी मोदी सरकार विरुद्ध ढोल पिटायला सुरुवात केली आहे.Urban Naxal Arundhati Roy to be tried under UAPA for advocating freedom for Kashmir!!
प्रत्यक्षात अरुंधती रॉय यांनी 2010 मध्ये काँग्रेस प्रणित UPA सरकार सत्तेवर असताना दिल्लीमध्ये काश्मीरच्या आजादीसाठी “हेट स्पीच” दिले होते. त्यावेळी UPA सरकारनेच त्यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी पावले उचलली होती. त्याच सरकारने UAPA कायदा देखील मंजूर केला होता. त्यामुळे त्यांच्याच UAPA कायद्यानुसार आता अरुंधती रॉय यांच्यावर काश्मीरच्या आजादीची वकिली केल्याबद्दल खटला चालणार आहे.
अरुंधती रॉय यांच्याबरोबरच जम्मू काश्मीर आंतरराष्ट्रीय कायदा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांनी देखील “हेट स्पीच” दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर देखील UAPA कायद्याअंतर्गतच खटला चालणार आहे. जम्मू काश्मीर मध्ये स्वातंत्र्य युद्ध सुरू आहे. भारतीय सैन्यदले जम्मू काश्मीर मधल्या स्वातंत्र्य योद्ध्यांवर अत्याचार करतात, असा कांगावा पाकिस्तान आणि चीन करत असतात. त्या कांगाव्याची तळी उचलून धरणारी आणि भारताच्या अखंडतेशी, सार्वभौमत्वाशी आणि सुरक्षिततेशी खिलवाड करणारी वक्तव्ये अरुंधती रॉय आणि शेख शौकत हुसेन यांनी केली होती. त्यामुळे आता त्यांना कायद्याच्या बडग्याला सामोरे जावे लागणार आहे.
Arundhati Roy is to be prosecuted under UAPA for an allegedly anti-India speech made in 2010, advocating "Azadi for Kashmir." The L-G today gave the nod for the case to be brought to trial, claiming "enough evidence." The case was filed by the UPA government, of which the… pic.twitter.com/DoY099Vgyr — Rahul Shivshankar (@RShivshankar) June 14, 2024
Arundhati Roy is to be prosecuted under UAPA for an allegedly anti-India speech made in 2010, advocating "Azadi for Kashmir."
The L-G today gave the nod for the case to be brought to trial, claiming "enough evidence."
The case was filed by the UPA government, of which the… pic.twitter.com/DoY099Vgyr
— Rahul Shivshankar (@RShivshankar) June 14, 2024
बुकर पुरस्कार ते अर्बन नक्षल
अरुंधती रॉय या बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका आहेत. त्यांच्या “द ऑफ स्मॉल थिंग्स” या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर अरुंधती रॉय खऱ्या अर्थाने प्रकाशात आल्या. त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. परंतु, दरम्यानच्या काळात त्या अर्बन नक्षल बनल्या. देशात अंतर्गत अस्वस्थता निर्माण करून काश्मीरच्या आजादीची वकालत करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी काश्मीरच्या आजादीची वकालत केली. त्यामुळे तत्कालीन सरकारने त्यांच्यावर खटला दाखल करण्याचे प्रयत्न केले. परंतु, कायदेशीर कचाट्यात त्या अडकले. नंतर काँग्रेस सरकारने ते प्रयत्न सोडूनही दिले होते.
परंतु आता दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी अरुंधती रॉय आणि शेख शौकत हुसेन यांच्यासह अन्य लोकांवर UAPA कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यामुळे देशातल्या लिबरल गॅंग मध्ये खळबळ माजली आहे. त्यांनी मोदी सरकार भाषण स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचे ढोल पिटायला सुरुवात केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App