विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय तसाच लटकवत ठेवून काँग्रेसची लोकसभा सभापती, उपसभापती निवडणूका लढवायची तयारी!!

Rahul Gandhi avoiding opposition leaders post, but Congress contemplate to contest speaker election

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत 99 जागा मिळाल्याच्या आनंदाच्या भरात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी धडाधड दौरे सुरू केले, पण या सगळ्यांमध्ये राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय तसाच लटकवत ठेवला. तो निर्णय घेऊन तडफदारपणे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याच्या ऐवजी काँग्रेसने लोकसभेच्या सभापती पदाची आणि उपसभापती पदाची निवडणूक लढवण्याचा घाट घातला आहे. असेल ते विटवा नसेल ते भेटवा असला हा प्रकार आहे!! Rahul Gandhi avoiding opposition leaders post, but Congress contemplate to contest speaker election

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काल रायबरेली मध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. तिथल्या भाषणात राहुल गांधींनी अगदी राणा भीमदेवी थाटात प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणुकीला उभ्या राहिल्या असत्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठ्या फरकाने पराभव झाला असत्या, असा दावा केला. प्रत्यक्षात राहुल गांधींनी किंवा काँग्रेसने प्रियांका गांधींना कुठल्याच निवडणुकीत तिकीट दिले नाही हा भाग अलहिदा. इतकेच काय पण रॉबर्ट वाड्रा यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असताना त्यांचेही तिकीट गांधी परिवाराने कापले, पण काँग्रेसला मोठी यश मिळाल्यानंतर मात्र राहुल गांधींनी प्रियांका गांधी वाराणसीतून निवडून आले असत्या, असे मानभावी भाषण केले.

 त्या पाठोपाठ राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यांनी मल्लपूरम येथे मोठा रोड शो केला. वायनाडच्या मतदारांचे त्यांनी आभार मानले, पण या सगळ्यांमध्ये राहुल गांधी यांनी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय मात्र तसाच लटकवत ठेवला. राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते व्हावे, असा ठराव काँग्रेसच्या कार्यकारिणीने मंजूर केला. सगळ्या काँग्रेस नेत्यांनी तसा जोरदार आग्रह धरला. परंतु, ते जबाबदारीचे पद मात्र स्वीकारायला अद्याप तरी राहुल गांधींनी नकार दिल्याचे दिसते. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेत कायदेशीर चौकटीत राहून नरेंद्र मोदींना सामोरे जायला बिचकत असल्याची प्रतिमा तयार व्हायला लागली आहे.

राहुल गांधींची ही प्रतिमा होऊ नये यासाठी काँग्रेस नेत्यांचा आटापिटा चालू आहे, पण राहुल गांधी ऐकायला तयार नाहीत. त्याऐवजी काँग्रेस आता लोकसभेच्या सभापती पदाच्या आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीमागे लागलेली आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला आव्हान देऊन त्या पक्षाची कोंडी करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे, पण आपल्या हक्काचे विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारायचे टाळून हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचा प्रकार काँग्रेस नेत्यांनी चालविला आहे.

Rahul Gandhi avoiding opposition leaders post, but Congress contemplate to contest speaker election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात