विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यात छत्रपती संभाजीनगरची तनिशा बोरमणीकर राज्यातून पहिली आली आहे. तिने 100 % गुण मिळविले आहेत. तनिशाने कसा अभ्यास केला?? अभ्यासाला किती तास दिले??, ती टेन्शन फ्री कशी राहिली??, याचे रहस्य तिनेच उलगडून सांगितले. तनिशा सायन्सची नव्हे, तर कॉमर्सची विद्यार्थिनी आहे.
तनिशा म्हणाली :
बारावीत 100 % गुण मिळतील असे मला अजिबात वाटलंच नव्हतं. 95 % गुण मिळतील असं वाटल होतं, पण पैकीच्या पैकी 100 % गुण मिळतील असं वाटलं नव्हत.
मी शेवटचे 2 महिने अभ्यास केला. माझ्या बुद्धीबळ स्पर्धा असायच्या. त्यामुळे पूर्ण वेळ अभ्यास करु शकले नव्हते. पण शेवटचे 2 महिने खूप अभ्यास केला. बारावीच्या परीक्षेचे मी एवढं टेन्शन घेतलं नव्हतं. माझ्यावर घरच्यांचाही दबाव नव्हता. आज निकालाच्या दिवशी नर्व्हस होती. पण आता खूष आहे.
मी 10 – 12 तास वगैरे अभ्यास नाही केला, मागच्या वर्षीचे पेपर सोडवत गेले. मॉक टेस्ट रोज सोडवत होते. त्यामुळे माझा अभ्यास होत गेला. या दिवशी मला एखाद्या विषयाचा अभ्यास पूर्ण करायचाय. मग कितीही वेळ लागू दे असं टार्गेट मी ठरवलं होतं.
कॉमर्स का घेतलं?
माझी दहावीची परीक्षा झाली तेव्हा मी बुद्धीबळात राष्ट्रीय चॅम्पियन झाले होते. त्यावेळी सायन्स मला घ्यायचे नव्हते आणि मला सायन्समध्ये आवड देखील नव्हती.
भविष्यात मला सीए बनायचे आहे. मी फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतेय, असे तिने सांगितले.
निकालाची विभागनिहाय आकडेवारी
कोकण 97.51 % लातूर 92.36 % नाशिक 94.71 % अमरावती 93.00 % कोल्हापूर 94.24 % मुंबई 91.95 % छत्रपती संभाजीनगर 94.08 % नागपूर 92.12 % पुणे 94.44 %
पुरवणी परीक्षेसाठी कधी करायचा अर्ज?
सर्व विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 या दरम्यान असणाऱ्या दोन संधीच हाताशी असतील. जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यासाठी 27 मेपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत याची नोंद घ्यावी.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App