
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोण रडले खरे??, कोण रडले खोटे??; बारामतीच्या काका – पुतण्यांमध्ये नवे भांडण जुंपले!! Who’s tears were true??, uncle – nephew quarrel hits baramati
त्याचे झाले असे :
बारामतीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवारांनी जे भाकीत केले होते, तसेच घडले. शरद पवारांच्या बारामतीतल्या शेवटच्या सभेत रोहित पवार भाषण करताना स्टेजवर रडले. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही परत डोळे मिटण्याची भाषा करू नका, असे म्हणत रोहित पवार रडले. तिथे असलेल्या बाटलीतले पाणी पिऊन रोहित पवारांनी भाषण पुढे चालू केले.
अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण #ED ची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत… आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 5, 2024
पण रोहित पवारांच्या रडण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. तो अजित पवारांच्या बारामतीतल्या सभेत पोहोचला. अजित पवारांनी तो व्हिडिओ पाहताच त्यांना आयता मुद्दा मिळाला. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शेवटच्या प्रचारसभेत रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल केली. मी तुम्हाला सांगितले होते, ते काहीतरी नौटंकी करतील. तशी नौटंकी त्यांनी केलीच. आमचा पठ्या स्टेजवर रडला. पण बारामतीकर ही नौटंकी सहन करणार नाहीत, असे सांगून अजित पवारांनी मी पण रडून दाखवतो म्हणून रडण्याचे नाटक केले. खिशातून रुमाल काढून डोळे पुसले. अजितदादांच्या या नक्कल करण्याचा व्हिडिओ पण व्हायरल झाला.
पण अजितदादांनी रडण्याची नक्कल केल्यामुळे रोहित पवार संतापले. अजून त्यांनी अजितदादांचा निषेध करणारी एक पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिली अजितदादा माझे आशीर्वाद खरे होते. तुम्हाला ईडीची नोटीस आल्यानंतर तुम्ही जे नक्राश्रू ढाळले, म्हणजे तुमच्या डोळ्यात जसे मगरीचे अश्रू आले, तसे माझे अश्रू नव्हते. त्यासाठी माणसाचे मन संवेदनशील लागते. माणसाला काळीज लागते. असे रोहित पवारांनी अजितदादांना लिहून ऐकवले. एकूण बारामतीच्या प्रचारात कोण रडले खरे??, कोण रडले खोटे??, यावरून काका – पुतण्यांमध्ये नवे भांडण जुंपले!!
Who’s tears were true??, uncle – nephew quarrel hits baramati
महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांच्या डोळ्यातून अश्रुधारा, अश्रू सुकले सुप्रियांच्या डोळा, अजितदादांच्या भाषणातून बरसल्या नक्कलेच्या धारा!!
- 10 मतदारसंघांमधला प्रचाराचा ताण, घसाही बसला; प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द!!
- ICC ने जाहीर केले महिला T20 विश्वचषक 2024चे संपूर्ण वेळापत्रक!
- ‘पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत…’ फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त विधान!