भटकता आत्मा आणि महाराष्ट्रातील अस्थिरता यांचा संबंध जोडून मोदींनी विधानसभा निवडणुकीचाही टोन केला सेट!!

– भटकत्या आत्म्याने महाराष्ट्र अस्थिर केला आता देश अस्थिर करायला निघालाय; पुण्यातून मोदींचा शरद पवारांवर जबरदस्त प्रहार!!

नाशिक : भटकता आत्मा आणि महाराष्ट्रातली अस्थिरता यांचा संबंध जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा टोन आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच सेट केला. PM Modi targets Sharad pawar as unrestful ghost!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वेगळी “केमिस्ट्री” असल्याचे सातत्याने बोलले जात होते. मोदी पवारांचा आदर करून त्याची पुष्टीही करत होते. परंतु, आजच्या पुण्यातल्या सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर आत्तापर्यंतचा सर्वांत प्रखर हल्ला चढवून त्यांच्या संपूर्ण राजकारणाचे वाभाडे काढणारे वक्तव्य केले.

आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण न करू शकलेल्या भटकत्या आत्म्याने आधी महाराष्ट्र अस्थिर केला आणि आता तो भटकता आत्मा देश अस्थिर करायला निघालाय, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर पुण्याच्या जाहीर सभेत जबरदस्त प्रहार केला. मोदींनी अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रहार केल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.

पुण्याच्या रेसकोर्स मैदानावर पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचंड जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी प्रखर शब्दांमध्ये शरद पवार आणि राहुल गांधी यांचे अक्षरशः वाभाडे काढले.

आत्तापर्यंत मोदींनी निवडणुकीच्या प्रचार सभेत शरद पवारांवर अनेकदा टीका केली, पण ती त्यांच्या धोरणांवर टीका होती. किंवा प्रामुख्याने काँग्रेसवर टीका करताना शरद पवारांवर टीका करणे किंवा शरद पवारांचा वेगळा “वापर” करणे एवढ्या पुरतेच मोदींनी शरद पवारांचे “महत्त्व” ठेवले होते. किंबहुना शरद पवारांवरची टीका मोदी तोंडी लावण्यापुरतीच करत असत. आपल्या टीकेचा सगळा रोख मोदी कायम काँग्रेसवर विशेषतः गांधी परिवारावर ठेवत असत. पुण्याच्या आजच्या सभेत मोदींनी गांधी परिवारावर आपला टीकेचा रोख तर ठेवलाच, पण शरद पवारांच्या सगळ्या आयुष्यभराच्या राजकारणाचे अत्यंत मोजक्या, पण अतिशय तिखट शब्दांमध्ये वाभाडे काढले. किंबहुना मोदींनी पवारांवर भटकता आत्मा म्हणून प्रखर टीका करणे हेच मोदींच्या आजच्या पुण्यातल्या भाषणाचे खरे वैशिष्ट्य ठरले.

नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे की या राज्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये स्थिर सरकारच पाहिले नाही. महाराष्ट्रात आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण न करू शकलेला एक भटकता आत्मा फिरतो आहे. तो सगळा महाराष्ट्र अस्थिर करतो आहे. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही ना, मग इतरांनाही काम करू द्यायचे नाही, हे त्या भटकत्या आत्म्याचे काम झाले आहे. 45 वर्षांपूर्वी या भटक्या आत्म्याने महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम सुरू केले. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीचे सरकार आले तेव्हा सुद्धा हा भटकता आत्मा महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या नादी लागला होता. 2019 मध्ये तर या भटकत्या आत्म्याने कमालच केली. संपूर्ण महाराष्ट्राने महायुतीच्या बाजूने दिलेला कौल धुडकावला. पण या भटकत्या आत्म्याचे स्वप्न फार काळ नंतर पूर्ण होऊ शकले नाही.

मोदींनी पुण्याच्या भाषणापूर्वी आयबीएन लोकमतला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत महाराष्ट्राविषयीच्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तर देताना महाराष्ट्रातल्या अस्थिरतेवर ते विस्ताराने बोलले. अगदी विलासराव देशमुख, शरद पवार यांची त्यांनी आठवण काढली. त्याच वेळी काँग्रेस – राष्ट्रवादीचे आघाडी सत्तेवर असून देखील कुठल्याही मुख्यमंत्र्याने देशात महाराष्ट्रात पाच वर्ष सलग राज्य केले नव्हते यावर त्यांनी या मुलाखतीत नेमकेपणाने बोट ठेवले.

पण त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे दीर्घ काळानंतर महाराष्ट्रात 5 वर्ष सक्षमतेने सरकार चालवणारे नेते होते, हे मोदींनी त्या मुलाखतीत आवर्जून सांगितले. याचा अर्थ महाराष्ट्रातली अस्थिरता आणि शरद पवार हा विषय मोदींच्या डोक्यात आधीपासूनच घोळत होता. किंबहुना त्यांनी या विषयाची मांडणी स्ट्रॅटेजिकली करायची हे आधीच ठरवले होते. त्यानुसार त्यांनी पुण्याच्या सभेत अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवारांवर भटकता आत्मा म्हणून प्रखर हल्ला चढविला. पवारांची वर्षानुवर्षाची दबलेली महत्त्वाकांक्षा त्यांनी नाव न घेता जनतेसमोर उघडी केली. किंबहुना पवार आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नसल्यानेच एवढे अस्थिर वागतात हे पंतप्रधान मोदींनी आज जाहीरपणे बोलून दाखविले आणि ते बोलून दाखवताना “भटकता आत्मा” इतके प्रखर शब्द वापरले.

मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा टोन सेट केला. मोदींना महाराष्ट्रासारखे मोठ्या राज्यात स्थिरता हवी आहे आणि ती स्थिरता त्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रस्थापित करून महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार आणायचे आहे हेच मोदींनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित करून सांगितले. पण या विधानसभा निवडणुकीत पवार नावाचा भटकता आत्मा कशी अस्थिरता पसरवू शकतो??, कोणाला चिथावणी देऊ शकतो??, याची मोदींना निश्चित माहिती आहे. त्यामुळेच मोदींनी भटकता आत्मा एवढी प्रखर टीका करून विधानसभेच्या प्रचाराचा आगाज केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात स्थिर सरकार आले आहे आणि ते चांगले काम करत आहे. पण हा भटकता आत्मा आता देशात अस्थिरता निर्माण करायला निघाला आहे. देशातले स्थिर सरकार प्रगती करते आहे हे या भटकत्या आत्म्याला पाहावत नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना अक्षरशः ठोकून काढले. हेच मोदींच्या आजच्या भाषणाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य ठरले.

PM Modi targets Sharad pawar as unrestful ghost!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात