केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसवर साधला निशाणा, म्हणाले…
भाजप सबका साथ, सबका विश्वास यावर काम करते, तर काँग्रेस तुष्टीकरणाचे घृणास्पद राजकारण करते. असंही म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकातील ओबीसी आरक्षणाच्या वादावरून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाला घुसखोरांना एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण द्यायचे आहे.Congresss ploy to give SC, ST and OBC reservation to intruders Keshav Prasad Maurya
परंतु भाजप सबका साथ, सबका विश्वास यावर काम करते. तर काँग्रेस तुष्टीकरणाचे घृणास्पद राजकारण करते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की, इंडिया आघाडी आणि काँग्रेसकडून एससी, एसटी आणि ओबीसींचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत.
ज्याप्रकारे ओबीसी वर्गाचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना देण्यात आले, ते ओबीसी वर्गाचे हक्क हिरावल्यासारखे आहे, असे मौर्य म्हणाले. भाजप नेहमीच सबका साथ, सबका विश्वास या तत्त्वावर काम करते. काँग्रेसचा नेहमीच घृणास्पद तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा इतिहास आहे.
देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते. हे संविधान आणि निर्मात्यांच्या विरोधात आहे. काँग्रेस पक्षावर आणखी हल्ला चढवत ते म्हणाले की, कर्नाटक सरकार हे व्होट बँकेसाठी करत आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मंडल आयोगाच्या अंतर्गत मुस्लिम समाजातील जे लोक ओबीसी वर्गातही येत नाहीत त्यांना आरक्षणाच्या श्रेणीत समाविष्ट केले आहे.
केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, काँग्रेस आणि प्रिन्स राहुल गांधी यांना कर्नाटक मॉडेल लागू करायचे आहे, जेणेकरून ते ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण हक्क हिसकावून मुस्लिमांना देऊ शकतील. व्होट बँकेसाठी काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क हिसकावून घुसखोरांना देत आहे. ते म्हणाले की काँग्रेस पक्ष स्वतः आयसीयूमध्ये पडून आहे, त्यांचे नेते राहुल गांधी म्हणतात की ते संपूर्ण देशाचे एक्स-रे करणार आहेत. घुसखोरांना अधिकार देण्याचा काँग्रेसचा डाव आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App