विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवार सोयल शेख यांना निवडणूक आयोगाने ट्रम्पेट चिन्ह दिले, परंतु ते तुतारी चिन्ह आहे, असे समजून सुप्रिया सुळे यांनी त्यावर आक्षेप घेतला. सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली. Trumpet is the election symbol of Soyal Sheikh
वास्तविक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह “तुतारी फुंकणारा माणूस” असे आहे, तर सोयल शेख यांना निवडणूक आयोगाने ब्रिटिश वाद्य असणारे “ट्रम्पेट” हे चिन्ह दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह आधीच मिळालेले असताना अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हे चिन्ह देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याला आक्षेप घेतला. मात्र, हा आक्षेप डावलून सोयल शेख यांना “ट्रम्पेट” चिन्ह देत असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केले. यानंतर सोयल शेख युनुस शेख शेख यांनी आनंद व्यक्त केला. बारामतीमधून आपण 1 लाख मतांनी निवडून येऊ असा दावा केला.
सोयल शेख यांना मिळाले निवडणूक चिन्ह हे ट्रम्पेट हे आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होतो. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाने “तुतारी” असे केले आहे. सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी त्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याचबरोबर हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकाराबाबत बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्ध्यात आम्हाला न्याय मिळाला, पण बारामतीमध्ये वेगळी प्रोसेस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाकडे एक महिन्यापासून फॉलोअप घेतोय. महाराष्ट्रात जिथे आमचा उमेदवार आहे, तिथे हे केलं जातंय, असं सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना सांगितलं.
सुप्रिया सुळेंचे निवडणूक आयोगाला पत्र
मी, सुप्रिया सदानंद सुळे यांचा निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया आपणाकडे खालील प्रमाणे हरकत घेतो की, आज ३५ बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांचे चिन्ह वाटपाबाबत आपण बैठक बोलवली होती. सदर बैठकीमधे आपण आम्हास आमच्या पक्षाकरिता राखीव असलेले चिन्ह (तुतारी फुंकणार माणूस) याचे वाटप आम्हास केले. परंतु अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना अपक्ष उमेदवार करिता चिन्ह तुतारी (trumpet) असे वाटप केले आहे. सदर वाटपास आमची हरकत आहे.
दोन्ही चिन्हाचे नावामधे साधर्म्य असल्याने चिन्ह तुतारी फुंकणार माणूस व तुतारी हे नाव सारखे आहे. राज्यपक्ष म्हणून आम्हास वाटप केलेले चिन्ह (तुतारी फुंकणार माणूस) ह्या नावात तुतारी या नावात साम्य असल्याने मतदार यांचा गोंधळ होऊ शकतो.
आता सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक काय निर्णय घेतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App