‘काँग्रेसचे राहुलयान ना कुठेही लॉन्च झाले, ना कुठं उतरले’

राजनाथ सिंह यांनी केरळमध्ये राहुल गांधींना लगावला टोला Rajnath Singh said Rahulyan of Congress was neither launched anywhere nor landed anywhere

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढले. 2019 मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींमध्ये यावेळी तिथून उभे राहण्याची हिंमत नाही, असा आरोप राजनाथ यांनी केला.

राजनाथ सिंह म्हणाले की, पराभवानंतर गांधी उत्तर प्रदेशातून केरळला गेले होते. भाजपचे उमेदवार अनिल के अँटोनी यांना पाठिंबा मिळवण्यासाठी पठाणमथिट्टा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सभेत बोलताना त्यांनी दावा केला, ” मी ऐकले आहे की वायनाडच्या लोकांनीही त्यांना खासदार न करण्याचा निर्णय घेतला आहे.”

राजनाथ सिंह यांनी असेही सांगितले की, देशात विविध अंतराळ कार्यक्रम आणि प्रकल्प सुरू केले जात आहेत, परंतु गेल्या काँग्रेसच्या युवा नेत्याचे 20 वर्षांपासून लॉन्चिंग झालेले नाही. काँग्रेस पक्षाचे ‘राहुल्यान’ ना लाँच झाले आहे ना ते कुठेही उतरले आहे.’

आपल्या भाषणादरम्यान, राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांचे कौतुक केले आणि त्यांचे शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ व्यक्ती म्हणून वर्णन केले ज्यांच्या प्रामाणिकपणा आणि सचोटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले. तसेच अनिल अँटनी लोकसभा निवडणुकीत हरले पाहिजे, असे ए के अँटनी यांचे विधान ऐकून आश्चर्य वाटल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले.

Rajnath Singh said Rahulyan of Congress was neither launched anywhere nor landed anywhere

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात