पंतप्रधान मोदींनी विमानात अनुभवला बालक रामांचा सूर्य तिलक सोहळा!!

Prime Minister Modi experienced Surya Tilak

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर उभ्या राहिलेल्या अयोध्या राम जन्मभूमी मंदिरात बालक रामांचा सूर्य तिलक सोहळा झाला. अयोध्यातल्या लाखो भाविकांनी तो प्रत्यक्ष अनुभवला, तर जगभरातल्या कोट्यावधी भाविकांनी तो स्क्रीनवर पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही त्यांच्यातच समावेश होता.Prime Minister Modi experienced Surya Tilak ceremony of baby Rama in the plane!!



पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज आसाम मधल्या नलबाडी येथे भव्य रॅली होती. त्या रॅलीत मोदींनी अयोध्येतल्या सूर्य तिलक सोहळ्याचा उल्लेख केलाच, पण त्याचबरोबर तो सोहळा त्यांनी त्या रॅली नंतर विमानात आपल्या टॅब वरून अनुभवला स्वतः मोदींनी त्या संदर्भात ट्विट करून माहिती दिली.

अयोध्येत शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर भव्य राम मंदिर उभे राहिले आहे. या राम मंदिरातल्या पहिल्या रामनवमीनिमित्त बालक राम यांचा सूर्य तिलक सोहळा होत आहे. हा तिलक सोहळा देशात नवे चैतन्य घेऊन येवो. देशवासीयांना त्यातून प्रेरणा मिळून देश नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी काम करण्याची संधी मिळो, अशा आकांक्षा मोदींनी व्यक्त केल्या.

नलबाडी मधली रॅली संपल्यानंतर दिल्लीला परतत असताना मोदींनी विमानात आपल्या टॅबवर अयोध्येतल्या बालक रामांचा सूर्य तिलक सोहळा अनुभवला. प्रत्यक्ष तिलक सोहळा अनुभवताना मोदींनी आपल्या छातीवर हात ठेवून बालक रामांना नमस्कार केला. त्याचे फोटो मोदींनी आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले.

Prime Minister Modi experienced Surya Tilak ceremony of baby Rama in the plane!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात