बालक रामांच्या भव्य मंदिरात, सूर्य तिलक सोहळा प्रचंड उत्साहात; IndiaDST चा तंत्रज्ञान निर्मिती – वापरात सहभाग!!

In the grand temple of Balak Ram,

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्या : शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर उभ्या राहिलेल्या बालक रामांच्या भव्य मंदिरात पहिल्या राम नवमी निमित्त आज अयोध्येत प्रचंड उत्साहात सूर्याभिषेक सोहळा झाला. राम जन्माच्या पवित्र वेळेत बरोबर सूर्य माध्यांनी आला असताना श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक केला. हा अनुपम्य सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक अयोध्येत पोहोचले होतेच, परंतु जगभरातल्या भाविकांनी या सोहळ्याचे ऑन स्क्रीन दर्शन घेतले. सुमारे 4 मिनिटे सूर्याची किरणे बालक राम मूर्तीच्या मस्तकावर अभिषिक्त होत होती. In the grand temple of Balak Ram, Surya Tilak ceremony in great excitement!!



 

रामायण कथांंनुसार, जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता; तेव्हा सूर्यदेवाने येऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. याच प्रसंगाची पुनरावृत्ती करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरात विशेष तयारी करण्यात आली होती. आज दुपारी 12.00 वाजता, भारतीय विज्ञान तंत्रज्ञान संस्थांनी तयार केलेल्या एका खास तंत्राच्या मदतीने सूर्याची किरणे रामलल्लांच्या मूर्तीवर प्रक्षेपित करण्यात आली. रामलल्लांच्या कपाळावर या मदतीने सूर्यकिरणांचा तिलक लावण्यात आला.

अध्यात्माला विज्ञानाची जोड

अयोध्येतील राम मंदिर हे तीन मजली उंच आहे. यातील तळमजल्यावर असणाऱ्या गर्भगृहात बालक राम विराजमान आहेत. त्यामुळे याठिकाणी सूर्य किरणे पोहोचवणे हे एक आव्हान होते. यासाठी CSIR-CBRI रुडकी आणि बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.

यामध्ये तीन आरसे आणि एका लेन्सच्या मदतीने एक सेटअप तयार करण्यात आला. या आरशांच्या मदतीने मंदिरावर पडणारी सूर्याची किरणे ही आतल्या बाजूला वळविण्यात आली. गर्भगृहापर्यंत नेलेल्या सूर्य किरणांना लेन्सच्या मदतीने बालक रामांच्या कपाळावर फोकस करण्यात आले. यामुळे बालक रामांना ‘सूर्य-तिलक’ लावणे शक्य झाले, आणि हा सूर्यकिरणाभिषेक संपन्न झाला. यासाठी तयार करण्यात आलेल्या सेटअपमध्ये अत्यंत उच्च प्रतीचे आरसे आणि लेन्स वापरल्या आहेत. याच तंत्राच्या वापरातून दरवर्षी हा सोहळा असाच करण्यात येणार आहे.

या संदर्भात अभय करंदीकर @karandi65 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स यांनी ट्विटर वर विशेष माहिती दिली. @IIABengaluru , अंतर्गत स्वायत्त संस्था @IndiaDST, यांनी अयोध्येतील सूर्य तिलक प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. चैत्र महिन्यातील श्रीरामनवमीच्या निमित्ताने 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता श्री बालक रामांच्या मस्तकावर सूर्यप्रकाश प्रक्षेपित करण्यात आला आणि हा विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशाच प्रकारचा सूर्य तिलक सोहळा विधी दरवर्षी करण्यात येईल, असे अभय करंदीकर यांनी आवर्जून नमूद केले आहे.

In the grand temple of Balak Ram, Surya Tilak ceremony in great excitement!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात