विशेष प्रतिनिधी
उधमपूर : श्रावणात शिजवून मटण, लालू – राहुलना आणायचेय मुघलांचे शासन!!, अशा परखड शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या उधमपूर मध्ये सर्व विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांना देशातल्या बहुसंख्य समाजाच्या भावनांची कदरच नाही. जो समाज आपली धार्मिक भावना जपतो, विशिष्ट प्रथा परंपरा पाळतो, त्या प्रथा परंपरांना उद्ध्वस्त करण्याचे काम “इंडिया” आघाडीतले विरोधक करत आहेत. ते सनातन धर्माचा अपमान करतात. ते हिंदूंना शिव्या देतात, अशा शब्दांमध्ये मोदींनी इंडिया आघाडीतल्या सर्व विरोधकांचे वाभाडे काढले.
सनातन धर्मियांचा अपमान करताना विरोधक मुद्दामून त्यांच्या धर्मश्रद्धा डिवचतात. सनातन धर्मीय श्रावणासारखा पवित्र महिन्यात विशिष्ट प्रथा परंपरा पाळतात, तेव्हा राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव मुद्दामून मटण शिजवण्याचे व्हिडिओ टाकून त्यांच्या धर्मश्रद्धा डिवचतात. ही त्यांची मुघली मानसिकता आहे. मुघलांना जसे या देशातल्या धर्मश्रद्धांशी काही देणे घेणे नव्हते, उलट त्या धर्मश्रद्धा त्यांना पायदळी तुडवायच्या होत्या, तसेच सध्याच्या “इंडिया” आघाडीतल्या विरोधकांचे वागणे आहे, असे शरसंधान पंतप्रधान मोदींनी सर्व विरोधकांवर साधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी – गूगल CEO सुंदर पिचाई भेट; G20 अध्यक्षपदाचे समर्थन
मुघलांनी जेव्हा इथे आक्रमण केले, तेव्हा ते फक्त राज्यकर्ते बनून थांबले नाहीत. त्यांनी इथली मंदिरे तोडली. इथल्या समाजाच्या धर्मश्रद्धा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याच विखारी मानसिकतेतून सध्याचे “इंडिया” आघाडीचे विरोधक नवरात्रीमध्ये मुद्दामून मांसाहाराचे व्हिडिओ टाकून धर्मश्रद्धा डिवचतात. राज्यघटना तुम्हाला तुमचे खानपान निवडण्याचा अधिकार देते हे खरे आहे, पण म्हणून त्या खानपनाद्वारे देशातल्या बहुसंख्यांकांच्या धर्मश्रद्धा डिवचण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.
पंतप्रधान मोदींनी या भाषणामध्ये सुप्रिया सुळे, रोहित पवार किंवा शरद पवार यांची नावे घेतली नाहीत, पण या तिन्ही नेत्यांनी मुद्दामून हिंदू सणांच्या दिवशी मटण – मासे खाण्याचे व्हिडिओ शेअर केले होते. त्यावरून महाराष्ट्रात देखील मोठा गदारोळ उठला होता. शरद पवारांनी मटण खाल्ल्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेरून ते निघून गेले ही देखील घटना काही महिन्यांपूर्वीच घडली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App