विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतीत बंडाची “हूल” देऊन विजय शिवतारे अखेर यशस्वीच ठरले. ज्या अजितदादांनी विजय शिवतारे निवडून येतोच कसा बघतो असे पुरंदर मध्ये येऊन धमकावले होते, त्या अजितदादांसमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदरचा पुढचा किल्लेदार विजय शिवतारेच असतील, असे जाहीर करून विजय शिवतारे यांना पुरंदरच्या पुढच्या आमदारकीची किल्ली बहाल केली. Eknath shinde announced Vijay shivtare’s candidature for purandar assembly constituency infront of ajit pawar
काही झाले तरी बारामती लोकसभा निवडणूक लढवणार, अशी विजय शिवतारेंनी घेतलेली भूमिका महायुतीला तडा देणार होती. त्यांच्यामुळे राज्यभर बंड होण्याची शक्यता होती. मात्र विकासाचे राजकारण आणि नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला एक-एक जागा महत्त्वाची असल्याचे लक्षात आले. तालुक्यातील त्यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. मात्र पुरंदरचे पुढचे किल्लेदार हे विजय शिवतारे असतील, अशी घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या उपस्थित केली.
विजय शिवतरे यांनी बंड केल्यामुळे अजित पवार समर्थक हैराण झाले होते. बारामतीची लढत त्यांच्यासाठी सोपी उरली नव्हती. त्यामुळे अजित पवारांना आपल्या कट्टर विरोधकांशी शेवटी जुळवून घ्यावे लागले आणि विजय शिवतरे यांची पुरंदर मधली विधानसभेची उमेदवारी मान्य करावी लागली. सासवड येथे महायुतीचा मेळावा पार पाडला. यावेळी शिवतारेंना अजित पवार विधानसभेचा शब्द देतील, अशी आशा पुरंदरवासियांना होती. मात्र तो शब्द अजित पवारांच्या उपस्थित मुख्यमंत्री शिंदेंनी दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विजय शिवतारे खरे शिवसैनिक आहेत. त्यांनी एकदा ठरवले की तर ते ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. पुरंदरच्या लोकांसाठी त्यांची मोठी तळमळ आहे. माघार घेताना त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही, मात्र लोकांच्या कामांची यादीच आमच्यापुढे ठेवली. अनेक कामे रखडलेली आहेत. ती पूर्ण केली जातील. आता पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतारेच असतील, असे शिंदेंनी स्पष्ट केले. त्यावेळी उपस्थितांतून एकाने मंत्रिपदाचीही मागणी केली. त्यावर आधी आमदार तर होऊद्या, असेही शिंदे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवारांचे नाव निश्चित होताच माजी मंत्री विजय शिवतारेंनी बंडाचा झेंडा उभारला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांना ओपन चॅलेंज देऊन गत पराभवाचे उट्टं काढून बदला घेण्याची भाषा केली होती. शिवतारेंच्या आक्रमक भूमिका पाहता महायुतीतील नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे बोलले जात होते. मात्र वर्षा बंगल्यावर शिवतारेंची समजूत काढण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आहे. त्यानंतर शिवतारेंनी अजित पवारांविरोधात उपसलेली तलवार म्यान केली. यावर अजित पवारांनी शिवतारेंचे शत्रुत्व पाहिले, आता मित्रत्व पाहू, अशी टिप्पणी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App