विशेष प्रतिनिधी
रामटेक : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव होणारच आहे त्यामुळे ते देशातले संविधान बदलण्याविषयी अपप्रचार करतात पण अशा अपप्रचार करण्याचा करणाऱ्या काँग्रेसनेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपविले. त्यांना भारतरत्न किताबापासून वंचित ठेवले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामटेक मधल्या प्रचार सभेत केली.Babasaheb’s politics was ended by the Congress, which was campaigning to change the constitution; Modi’s attack from Ramtech
कॉंग्रेसने एक देश एक कायदा लागू होऊ दिला नाही, काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न किताबापासून अनेक वर्षे वंचित ठेवले, केवळ जातीभेदाचे राजकारण कॉंग्रेसवाल्यांनी केले, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भाजप-शिवसेनेच्या रामटेक, नागपूर आणि भंडारा-गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची रामटेकमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
संविधान बदलाचा खोटा अपप्रचार सुरू
“इंडिया” आघाडीवाले एक खोटं पसरवत आहेत की, मोदी पुन्हा सरकारमध्ये आले तर लोकशाही आणि संविधान संकटात येईल. मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हापासून अशी एकही निवडणूक नाही की, ज्यामध्ये विरोधकांनी अशी भाकडकथा ऐकवलेली नाही. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार बनलं तेव्हाही ते असेच संविधान बदलण्याची भाषा करत होते. याचा अर्थ काँग्रेस आणि विरोधकांकडे मोदी सरकारला हरवायला नवे मुद्देच नाहीत. आजच्या वेळी एका गरीबाचा मुलगा देशाचा पंतप्रधान आहे त्यावेळी काँग्रेसला वाटते लोकशाही धोक्यात आली पण त्याच काँग्रेसवाल्यांनी देशावर आणीबाणी लाभली त्यावेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती का??, असा खोचक सवाल मोदींनी केला.
शिवीगाळ वाढली की समजा विजय..!
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 19 एप्रिलला तुम्हाला फक्त एक खासदार निवडायचा नाही तर पुढच्या 1000 वर्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचं आहे. आपल्याला विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचे आहे. निवडणुकीबाबत मीडियाकडून सर्व्हे दाखवला जातोय. त्यात एनडीएचा बंपर विजय दाखवला जातोय. पण या सर्व्हेच्या मागे मीडियावाले इतका खर्च का करताथ? त्यांना पैसे वाचवण्याचा एक फॉर्म्युला देतो. मोदीला जेव्हा शिव्या वाढायला लागल्या की तर समजायचे पुन्हा मोदी जिंकून येणार. जेव्हा विरोधक माझ्या आई-वडिलांबद्दल मला अपशब्द बोलतात तेव्हा समजून जायचं पुन्हा एकदा मोदी सरकार. ईव्हीएम प्रश्न उपस्थित झाले तेव्हा समजून जा पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे समजून घ्या, असे शरसंधान मोदींनी साधले.
– पाण्यात काठी मारली तरी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एका गरिबाचा मुलगा पंतप्रधान बनताच त्यांना लोकशाही आणि संविधान धोक्यात दिसत आहे. इंडिया आघाडीवाले कधीही गरिबांना पुढे जाताना बघू शकत नाहीत. मराठीत एक म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. पाण्यात कितीही लाठी मारा. पाणीत भेद होणार नाही. गरिबाच्या मुलावर या लोकांनी कितीही हल्ला केला तरी मोदी देशाच्या संकल्पनांसाठी मागे हटणार नाही. “इंडिया” आघाडीवाले पूर्ण ताकदीने देशाचे विभाजन करायला लागले आहेत. त्यांना माहिती आहे की, देशातील सर्वजण एकजूट झाले तर त्यांचं राजकारण संपून जाईल, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
कॉंग्रेसवाल्यांनी कधीही बाबासाहेबांचे संविधान लागू केले नाही. 370 कलम हटवले तर कुठेही काश्मीरमध्ये कुठेही आग लागली नाही, हे तेथील लोकांना देखील मान्य झाले. दुसरी गोष्ट म्हणजे कॉंग्रेसवाले म्हणतात की, 370 हटवल्याने देशाला फायदा काय झाला. अरे यांना काय माहित आहे की, तेथील एससी, एसटी, ओबीसी यांना त्यांच्या वंचित अधिकारापासून लाभ झाला आहे.
2019 मध्ये सरकार बनले. तेव्हा आदिवासी समाजातील एक महिला देशाच्या प्रथम नागरिक बनल्या. ओबीसीसाठी व आदिवासी कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात बजेट वाढवले गेले. NDA सरकारच्या सरकारमुळे सर्व जाती धर्मातील युवकांना व लोकांना त्याचा फायदा झाला आहे. सबका साथ – सबका विकास ही भावना म्हणजे संविधानाची तीच भावना आमची आहे.
परंतु परिवारावादी पार्ट्यांनी केवळ गरीबांना वंचित ठेवले आहे. पण भाजपच्या काळात आता शंभर टक्के गरीबांना व गरजूंना मदत मिळत आहे. तेव्हाच सामाजिक विकास आहे, शंभर टक्के लोकांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळत आहे. गरीबांना पक्के घर देण्याचे गॅरंटी असो, मोदींच्या या गॅरंटीचे लाभार्थी एसटी, एसटी, ओबीसी समाजातील लाभार्थी आहे. याचा परिणाम असा झाला की, 25 कोटी देशवासीय गरीबीतून बाहेर पडले, असे मोदी म्हणाले.
रामटेक, महाराष्ट्रासह देशाला सर्वाधिक आनंद आहे की, यंदा रामनवमी भव्य मंदिरात होत आहे. या इंडिया आघाडीवाल्यांनी मंदिर प्राणप्रतिष्ठेला देखील निमंत्रण नाकारले. हे सनातन धर्माला संपवायला निघाले आहेत, हे लोक हिंदू धर्माच्या शक्तीला संपवायला निघाले आहेत. अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का, विरोधकांना त्यांना त्यांच्या चूकांची शक्ती देणार की नाही, असा सवाल देखील मोदींनी सभास्थळावरील लोकांना केला.
#WATCH | PM Modi in Maharashtra's Ramtek says, "The work I have done in the last 10 years is an appetiser, Thali aani baaki hai…I give you a guarantee – 'Har pal desh ke naam, har pal aap ke naam'; 24 by 7 for 2047…" pic.twitter.com/JV7pNXWEdl — ANI (@ANI) April 10, 2024
#WATCH | PM Modi in Maharashtra's Ramtek says, "The work I have done in the last 10 years is an appetiser, Thali aani baaki hai…I give you a guarantee – 'Har pal desh ke naam, har pal aap ke naam'; 24 by 7 for 2047…" pic.twitter.com/JV7pNXWEdl
— ANI (@ANI) April 10, 2024
कॉंग्रेसला लोक नाकारतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2024 च्या निवडणुकीत देशातील जनता मोदींना प्रचंड मतांनी निवडून देईल, असा आम्हाला विश्वास आहे. राष्ट्रपतींना राष्ट्रपत्नी म्हणून हिणवणाऱ्या कॉंग्रेसला लोक नाकारणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
संविधान तर कॉंग्रेसवाल्यांनी तोडले
नितीन गडकरी म्हणाले की, 400 जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलणार आहोत, असा अपप्रचार कॉंग्रेसकडून केला जात आहे. मुळात संविधान तोडण्याचे काम कॉंग्रेसवाल्याने केला आहे. सबका साथ-सबका विकास हा निर्धार मोदींजींनी केलेला आहे. 60 वर्षात कॉंग्रेस जे करू शकले नाही ते मोदींच्या 10 वर्षात देशातील कामे झाली आहे. महाराष्ट्र सरकार व केंद्राच्या मदतीने राज्याचा विकास अतिशय वेगाने होत आहे. देशातील परिस्थिती बदलत चालली आहे.
कॉंग्रेसकडून अपप्रचार
कॉंग्रेसच्या पोपटांकडून संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. जो पर्यंत चंद्र-सूर्य तारे आहेत तो पर्यंत कोणीही संविधान बदलू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संविधान अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. पण माझा कॉंग्रेस वाल्यांना प्रश्न आहे की, तुम्हाला मतांसाठी समाज चालतो. पण त्या समाजासाठी कोणताही विकास करण्याची तुमची तयारी तरी आहे का?, देशाच्या विकासासाठी अधिक मजबूत करण्यासाठी नागपूर, भंडारा-गोंदिया व रामटेकमधील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावे, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले.
समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदियापर्यंत जाणार – फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासह विदर्भाचा विकास होत आहे. समृद्धी महामार्ग आता भंडारा, गोंदिया पर्यंत नेणार आहोत. त्यामुळे या भागाचा अधिक विकास होईल. 5 वर्षांत मोदींनी 50 कोटी लोकांच्या घरात पाणी पोहोचवले आहे, रामटेकमधील राम मंदिरासाठी आम्ही निधी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App