विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे नानांच्या गाडीचा जोरदार अपघात, पण काँग्रेसला सावरता येईना ठाकरे + पवारांनी केलेला घातपात!!… महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. Politics over accident : nana parole unable to contain disesendance in Congress
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या गाडीला एका ट्रकने मागून ठोकले. नानांची गाडी गाडी रस्त्यावर उभी होती. मागून ट्रक आला आणि तो गाडीवर आदळला. भंडारा शहरानजीकच्या भिलेवाड गावाजवळ हा अपघात झाला. अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. ट्रक चालकाचा अंदाज आणि नियंत्रण चुकल्याने हा अपघात झाला असावा, असा सुरुवातीचा निष्कर्ष पोलिसांनी काढला, पण काँग्रेसने मात्र तो मोठा घातपात असल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात नाना पटोले यांच्यासारख्या बड्या नेत्याला जायबंदी करण्याचा डाव असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. काँग्रेस नेत्यांचे हे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे राज्यसभा खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले. नाना पटोले यांनी घातपाताचे पुरावे द्यावेत, असे अशोक चव्हाण म्हणाले.
नाना पटोले यांच्या गाडीच्या अपघातावरून एकीकडे असे राजकारण सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस मधले नाराजी नाट्य मात्र अजिबात थांबण्याऐवजी वाढले. सांगली आणि भिवंडी या जागा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपापल्या पक्षांसाठी काँग्रेसकडून खेचून घेतल्या. त्यामुळे काँग्रेस नेते प्रचंड नाराज आहेत. नाराज नेत्यांपैकी विशाल पाटलांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला पोहोचले. विशाल पाटलांनी सांगलीतून अर्ज भरला, तर त्यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांकडे केली. त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी होकार दिला.
दुसरीकडे विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना सांगलीची जागा सोडून देण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आणि काँग्रेस नेत्यांनाही गंभीर इशारा दिला. तिसरीकडे दक्षिण मुंबईची जागा काँग्रेसच्या गळ्यात मारल्याने मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री वर्षा गायकवाड नाराज झाल्या. त्यांनी बैठकीलाच दांडी मारली. त्यामुळे काँग्रेसला मुंबई प्रदेशची बैठक रद्द करावी लागली. नानांच्या अपघातावरून जरी राजकीय नाट्य सुरू झाले असले, तरी प्रत्यक्षात काँग्रेस मधले अंतर्गत नाराजी नाट्य मात्र थांबवायला कुठलेच नेते पुढे येऊ शकले नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App