संदेशखळीतील महिलांचा छळ आणि जमीन हडप प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार

कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आदेश CBI will investigate the case of harassment and land grabbing of women in Sandeshkhali

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : संदेशखळीच्या घटनेवरून पश्चिम बंगालमध्ये बराच गदारोळ झाला होता. आता कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखळी येथील महिलांवरील अत्याचार आणि जमीन बळकावण्याच्या आरोपांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. संदेशखळी येथे ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचीही सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.

बुधवारी आपल्या आदेशात कोलकाता उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या देखरेखीखाली संदेशखळी येथे महिलांवरील गुन्हे आणि जमीन बळकावण्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. संदेशखळीच्या घटनांबाबत गेल्या गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते.

संदेशखळी येथील हिंसाचाराच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. संदेशखळी प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि पश्चिम बंगाल सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले होते.

CBI will investigate the case of harassment and land grabbing of women in Sandeshkhali

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात