चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश
विशेष प्रतिनिधी
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील चिकुरबत्ती-पुसबाकाजवळील जंगल परिसरात आज सकाळी ही चकमक झाली.Encounter between security forces and Naxalites in Chhattisgarhs Bijapur 6 Naxalites killed
सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. चकमकीत ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. डीआरजी, सीआरपीएफ 229 आणि कोब्रा टीमने नक्षलवाद्यांविरुद्धच्या या कारवाईत भाग घेतला.
बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक बुधवारी नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. दरम्यान, बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकुरभट्टी आणि पुसाबका गावांच्या जंगलात त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. ज्यामध्ये 6 नक्षलवादी मारले गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App