विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचा तिढा सुटो किंवा ना सुटो, आपले उमेदवार जाहीर करून घ्या असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्रातील 17 लोकसभा उमेदवार जाहीर केले. यामध्ये नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना लॉटरी लागली असून मावळात संजोग वाघेरे यांना संधी मिळाली आहे. All the loyalists in Shiv Sena Ubhatha first list
नाशिक मध्ये उमेदवारीसाठी विधान परिषदेचे आमदार विजय आप्पा करंजकर यांनी फिल्डिंग लावली होती पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या ऐवजी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यावर विश्वास दाखवला त्यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला होता त्याची बक्षिस ही त्यांना मिळाली अशीच बक्षीस उद्धव ठाकरेंनी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि पवारनिष्ठ नेते संजोग वाघेरेंना दिली. त्यांनी देखील नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला होता. काँग्रेस मधून शिवसेनेत परत आलेले भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा एकदा शिर्डीतून संधी मिळाली आहे. आपल्याशी निष्ठावान राहिलेल्या एकाही खासदाराचे तिकीट उद्धव ठाकरेंनी कापले नाही.
शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली असली, तरी प्रत्यक्षात 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काही विद्यामान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे सत्तेसोबत गेले नाहीत, त्या निष्ठावंतांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
1 बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
2. यवतमाळ- संजय देशमुख
3. मावळ – संजोग वाघेरे- पाटील
4. सांगली -चंद्रहार पाटील
5. हिंगोली- नागेश अष्टीकर
6. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
7. धाराशीव- ओमराजे निंबाळकर
8. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
9. नाशिक- राजाभाऊ वाझे
10. रायगड – अनंत गिते
11. रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
12. ठाणे- राजन विचारे
13. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
14. मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
15. मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
16. मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
17. परभणी- संजय जाधव
संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या 17 उमेदवारांची पहिली यादी ट्विट केली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य-श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे…, असं ट्विट करत संजय राऊतांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई वायव्य या मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करत या दोन जागा ठाकरे गटाने आपल्याकडे घेतल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App