वृत्तसंस्था
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने रविवारी निवडणूक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स) दुसरी यादी जाहीर केली. त्यात 523 पक्षांनी दिलेली माहिती आहे. 2018 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत 6,986.5 कोटी रुपये देणगी मिळाल्याचे भाजपने सांगितले. आपण फेब्रुवारी 2024 मध्ये योजना बंद होईपर्यंतची रक्कम जोडली तर हा आकडा 7,700 कोटी रुपये होईल.Lotteryking tops the second list of donations too, 501 crores to DMK; Second largest donation to Trinamool
सर्वाधिक 1,368 कोटींचे रोखे खरेदी करणाऱ्या लॉटरी किंग सँटियागो मार्टिनची कंपनी फ्यूचर गेमिंगने 509 कोटी रु.(37%) तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्ष द्रमुकला दिले. बहुतेक पक्षांनी देणगीदारांची नावे उघड केली नसल्याने लॉटरी किंगने उर्वरित 859 कोटी रुपये देणगी कुणाला दिली हे कळू शकले नाही. राजकीय पक्षांनी ही आकडेवारी आयोगाला सादर केली होती. 2018 मध्ये योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर 2023 पर्यंतचा डेटा आहे. एसबीआयने एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 24 मध्ये योजना बंद झाली इथपर्यंतचा डाटा दिला होता.
जदयूने म्हटले, ३ एप्रिल २०१९ रोजी कोणीतरी एक लिफाफा दिला. तो उघडला असता त्यात १-१ कोटींचे १० निवडणूक रोखे होते.भाजपला एका दिवसात ८ प्रसंगांना १०० कोटी मिळाले. एका दिवसात २०० कोटीही.भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी देणगी देणाऱ्यांचे नाव िदले नाही.बसपा, एआयएमआयएम, इनोले, उनपीपीसह अनेक छोट्या पक्षांना निवडणूक रोख्यांतून कोणतीही देणगी मिळाली नाही. माकप, भाकपने नैतिक आधारावर देणगी घेतली नाही.
कोणी देणगी दिली 10 पक्षांनी सांगितले
डीएमके, आप, जद-एस, नॅकाँ, एमजीपी, सपा, राष्ट्रवादी, एसडीएफ, जद-यू, एआयएडीएमकेने नावे व रक्कम सांगितली.
डीएमके: ६५६.५ कोटींच्या देणगीपैकी ७७% रक्कम फ्यूचर गेमिंगने दिली. १०५ कोटी मेघा इंजीनियरिंग, १४ कोटी इंडिया सिमेंट्स आणि १०० कोटी रुपये सन टीव्हीने दिले आहेत.
एआयएडीएमके: चेन्नई सुपर किंग्जची कंपनी इंडिया सिमेंट्स.
जेडीएस: 89.75 कोटी मिळाले. 50 कोटी मेघा इंजीनियरिंगने दिले. आदित्य बिर्ला ग्रुप, इन्फोसिस, जेएसडब्ल्ही दिले.
सपा: 10.84 कोटी मिळाले. 10 कोटींच्या रोख्यांवर नाव नाही.
आप: बजाज ग्रुप, टोरेंट फॉर्मा, केएमजेड इनव्हेस्टमेंटने दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App