उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे एकूण 254 आमदार आहेत.
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज, रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आपल्या आमदारांसह जाणार आहेत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मुख्यमंत्री योगी आमदारांसह मोठ्या संख्येने आमदारांसह प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत.Chief Minister Yogi will go to Ayodhya today along with all MLAs to have darshan of Ram Lalla
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे एकूण 254 आमदार आहेत. अशावेळी सर्व आमदार रामलल्लाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत अयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुपारी 12 वाजता अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. तर भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री 10 लक्झरी बसमधून अयोध्येला पोहोचतील. यादरम्यान बसेसमध्ये राम धुनही वाजवण्यात येणार आहे.
याआधी 1 फेब्रुवारीला मुख्यमंत्री योगी यांनी सर्व मंत्री आणि आमदारांसह रामलल्लाचे दर्शन घेण्याची योजना आखली होती. मात्र गर्दी पाहून त्यांनी नियोजित दौरा पुढे ढकलला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App