विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ईएमसी प्रमुख मौलाना तौकीर रझा यांना बरेली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर सामूहिक अटकेच्या घोषणेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले होते.Maulana Taukeer Raza taken into custody by police riot by supporters
इस्लामिया मैदान तसेच मौलाना यांच्या निवासस्थानासह प्रमुख रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुलांना शाळांमध्ये अर्धा दिवस सुट्टी देऊन घरी पाठवण्यात आले. शहराच्या मध्यभागी असलेल्या रोडवेज बसस्थानकावर बसची वाहतूक बंद करण्यात आली. बसेस बाहेरूनच काढल्या जात आहेत.
मौलाना तौकीर रझा यांनी सामूहिक अटकेची घोषणा केली होती. आता बरेलीतील मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. सर्वजण अटकेच्या मागणीवर ठाम आहेत. ही अटक शांततापूर्ण पद्धतीने व्हायला हवी, असे मौलाना यांनी म्हटले आहे.
तौकीर रझा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. जर कोणी गुन्हेगार असेल तर त्याचे घर, मदरसा, मशिदीवर बुलडोझर का चालवलं जात आहे.याचा आम्ही निषेध करू. म्हणाले, आम्ही आमचे संरक्षण करू, आम्हाला तसे करण्याचा अधिकार आहे. आमच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही त्याला ठार मारू. म्हणाले, पोलीस आणि हिंदुत्ववादी पक्ष देशाची नासधूस करत आहेत. याविरोधात बरेलीपासून मोहीम सुरू करण्यात आली असून ती संपूर्ण देशात चालवली जाणार आहे. असंही तौकीर रझा म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App