विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुंड मॉरिस याने फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरच गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. यामध्ये परवानाधारक शास्त्राचा वापर होता. त्याआधी देखील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी परवानाधारक पिस्तुलाचा वापर करूनच भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार ॲक्शन मोड मध्ये आले असून परवानाधारक शस्त्रांचा गैरवापर रोखण्यासाठी चौकशी तपास असून आणखी काही उपाययोजना करण्याचा विचार करीत असल्याचे समोर आले आहे.Gaikwad, Ghosalkar – Misuse of license arms in Morris cases; Shinde – Fadnavis government in action mode!!
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी हत्या झाली. ते शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. मॉरिस नावाच्या एका स्थानिक गुंडाने अभिषेक यांच्यावर अचानक जवळून गोळ्या झाडल्या. अभिषेक घोसाळकर यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. अभिषेक यांच्यावर फायरिंग केल्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या सगळ्या धक्कादायक प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आले. फेसबुक लाईव्ह केल्यानंतर मॉरिसने अभिषेक यांच्यावर अचानक हा गोळीबार केला. मॉरिसने आधीच कट रचला होता. त्याने पद्धतशीरपणे प्लानिंग करुन ही हत्या केली. या घटनेनंतर महाराष्ट्राचा बिहार झालाय का??, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्याावर गोळीबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “वर्षा” निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मागच्याच आठवड्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. या खूप गंभीर घटना आहेत. त्यामुळे सरकारला असे प्रकार रोखण्यासाठी ठोस पावल उचलावी लागतील. त्या संदर्भातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
बैठकीत काय चर्चा ?
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. परवानाधारक शस्त्रांच दुरुपयोग होताना दिसतोय. ज्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे, त्यांना बोलवण्यात येईल, त्यांची चौकशी होईल, असा निर्णय या बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कारण अशा घटनांमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले. त्यामुळे विरोधकांना प्रत्युत्तर देण्याबरोबरच राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कठोर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App