हरियाणात ‘NIA’ची कारवाई, सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील शार्प शूटर्सच्या घरावर छापा!

Action of NIA in Haryana

एनआयएचे पथक पहाटे पाच वाजता दोघांच्याही घरी पोहोचले.


विशेष प्रतिनिधी

सोनीपत : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पथकाने पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचे शार्प शूटर अंकित सेरसा आणि प्रियव्रत फौजी यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली.Action of NIA in Haryana raid on house of sharp shooters in Sidhu Mooswala murder case

सिद्धू मुसेवालावर गोळी झाडणारा अंकित हा सोनीपतमधील सेरसा गावचा रहिवासी आहे, तर प्रियव्रत फौजी हा गढी सिसाना गावचा रहिवासी आहे. एनआयएचे पथक पहाटे पाच वाजता दोघांच्याही घरी पोहोचले.



एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांसह दोघांच्या कुटुंबीयांची चौकशी करून त्यांच्या घरांची झडती घेतली. याआधीही एनआयएने या दोघांच्या घरांवर तीनदा छापे टाकले होते. याशिवाय स्थानिक पोलीसही या गावांमध्ये सतत गस्त घालत असतात.

दरम्यान एनआयएने जुलै महिन्यात लॉरेन्स बिश्नोईचे जवळचे सहकारी विक्रमजीत सिंग आणि विक्रम ब्रार यांना यूएईमधून भारतात आल्यानंतर लगेचच अटक केली होती. NIA ने विक्रम ब्रारला UAE मधून भारतात आणले होते. विक्रम ब्रार याच्यावर सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप होता. शिवाय टार्गेट किलिंग आणि खंडणीसह 11 गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड होता. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून त्याच्याविरुद्ध 11 लुकआउट नोटीस काढण्यात आल्या होत्या.

Action of NIA in Haryana raid on house of sharp shooters in Sidhu Mooswala murder case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात