‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियाना’च्या थीम सॉंगचे लोकार्पण
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली: मृद्ध आदिवासी संस्कृती, परंपरा आणि वैभवशाली वारसा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यात महायुती सरकारच्या पहिल्या जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान’ कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी आणि अधिकारी उपस्थित होते.The focus of the Mahayuti Government should be allround development of womens power Devendra Fadnavis
या कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियाना’च्या थीम सॉंगचे लोकार्पण, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नवरत्न महिलांचा गौरव आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप केले. या अभियानाचा जिल्ह्यातील लाखो महिलांना लाभ झाला.
याप्रसंगी फडणवीस म्हणाले, महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू केले आहे. महायुती सरकार ने महिला बचत गटांना आतापर्यंत सर्वाधिक असे 7,000 कोटीचे कर्ज दिले आहे. जल, जंगल, जमीन यांचे संरक्षण व संवर्धन करून गडचिरोली जिल्ह्याची प्रतिमा बदलण्याचे काम सुरू आहे. आधुनिक गडचिरोलीचा सर्वाधिक लाभ युवक व महिलांना होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App