‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान अंतर्गत लाभार्थी महिलांना लाभ वितरीत !

मुख्यमंत्री महिला सुरक्षा कव्हर अंतर्गत इन्शुरन्सचे वाटप


 

विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियानाच्या अंतर्गत मंगळवारी गडचिरोली येथे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत अनेक लाभार्थी महिलांना लाभाचे वाटप केले गेले खाली नमूद केलेल्या योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळाले.Under the Chief Minister Women Empowerment campaign benefits are distributed to women beneficiaries



तसेच यावेळी महिला नवरत्नांचा सन्मान करण्यात आला. यात गेली सात वर्षे ग्राम सभांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या सुलोचना सुरेश मडावी, मिसेस महाराष्ट्र 2021 व मिसेस इंडिया 2021 राहिलेल्या तसेच महिलांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणाऱ्या मनीषा मडावी, कोरोनाच्या काळात दुर्गम भागात 100 टक्के लसीकरण करणाऱ्या संगीता सुधाकर येरोजवार, जीवनाची 25 वर्षे नाट्यकलेला समर्पित करणाऱ्या सविता पसाराम भोयर यांचा समावेश आहे

याचबरोबर दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या रुपाली शरद महुर्ले, दुर्गम भागात टॅक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या तसेच इंग्लंड येथील लीड्स विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश मिळालेल्या किरण कूर्मावार, 2013 पासून एटापल्ली तालुक्यात अतिदुर्गम भागात प्रेरिका म्हणून व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या जुमना बुध्दराम देहानी, गडचिरोलीच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी कल्याणी किशोर कुट्टेवार, नक्षल सरेंडर महिला राजे उर्फ डेबो जयराम उसांडी या सर्वांचा सन्मान करण्यात आला, तसेच यावेळी मुख्यमंत्री महिला सुरक्षा कव्हर अंतर्गत इन्शुरन्सचे वाटप केले.

Under the Chief Minister Women Empowerment campaign benefits are distributed to women beneficiaries

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात