भारतविरोधी विधानानंतर आता मालदीवमध्ये होणार मोठा राजकीय भूकंप!

राष्ट्रपती मुजजू यांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील नागरिक यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीका आता मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुजजू यांच्या अडचणी वाढवू शकतात. याचा फायदा घेत, विरोधी आता अध्यक्ष मोहम्मद मुजजू यांना सत्तेतून काढून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत.After the anti India statement a big political earthquake will now take place in the Maldives

मालदीवमधील संसदीय अल्पसंख्याक नेते अली अझिम यांनी सोमवारी राष्ट्रपती मोहम्मद मुजजू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली. राष्ट्रपती मुजजू यांना सत्तेतून काढून टाकण्यास मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.



अली अझिम म्हणाले की आम्ही देशाच्या परराष्ट्र धोरणाची स्थिरता राखण्यासाठी आणि शेजारच्या कोणत्याही देशाला वेगळं करण्यापासून रोखण्यासाठी समर्पित आहोत. त्यांनी आपल्या डेमोक्रॅट पक्षाला विचारले की आपण राष्ट्रपती मुजजू यांना सत्तेतून काढून टाकण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यास तयार आहात का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या 3 मंत्र्यांनी आगाऊपणा करत भारताचा आणि पंतप्रधान मोदींचा अपमान करणारी ट्विट केली. हा विषय भारताने अत्यंत गांभीर्यपूर्वक घेऊन परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवच्या राजदूताला आज परराष्ट्र मंत्रालयात बोलवून त्यांची झाडाझडती घेतली. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांच्या चीन दौऱ्यापूर्वी मालदीवच्या उच्चायुक्तांची भारतीय परराष्ट्र मंत्रालयात झाडाझडती झाल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे पडसाद उमटून मालदीव सरकारची नाचक्की झाली आहे.

After the anti India statement a big political earthquake will now take place in the Maldives

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात