काँग्रेसचे वायनाडचे खासदार 2022 मध्ये 3570 किलोमीटर दक्षिणोत्तर चालले. कर्नाटक आणि तेलंगण ही राज्ये काँग्रेसने जिंकली, पण पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यासह पाच राज्ये काँग्रेसने गमावली. राहुल गांधी आता भारत न्याय यात्रेत पूर्व पश्चिम 6200 किलोमीटर चालणार आहेत, त्यामुळे 2024 चा निकाल नेमका कसा आणि काय लागेल??, असा सवाल तयार झाला आहे.Rahul Gandhi to travel 4000 KM in bharat nyaya yarra in regional parties ruled states, will challenge regional leaders rather than PM Modi
पण त्याही पलीकडे जाऊन राहुल गांधींच्या नव्या भारत न्याय यात्रेच्या प्रवासाचा नकाशा नीट पाहिला, तर आणखी एक महत्त्वाचा आणि कळीचा सवाल तयार होतो, तो म्हणजे राहुल गांधी पूर्व – पश्चिम 6200 किलोमीटर चालणार आहेत, त्यापैकी तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास ते एकतर प्रादेशिक पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमधून किंवा काँग्रेसने गमावलेल्या राज्यांमधून करणार आहेत. अशा वेळी राहुल गांधी त्या राज्यांमध्ये प्रवास करून प्रत्यक्षात काँग्रेससाठी काय मिळवणार??, हा तो कळीचा सवाल आहे!!
राहुल गांधींची भारत न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूरपासून सुरू होईल आणि 20 मार्चला मुंबईत संपेल. या यात्रेत 14 राज्यांचा समावेश आहे. राहुल गांधी बसने आणि पायी 6200 किलोमीटर प्रवास करणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतरही भारत न्याय यात्रेतही राहुल गांधी हेच प्रमुख चेहरा असतील. त्या अर्थी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यासारख्याच प्रादेशिक नेत्यांना आव्हान देतील, हे उघड गुपित आहे!! आता राहुल गांधींच्या रूपाने काँग्रेसचे हे आव्हान प्रादेशिक नेत्यांपुढे उभे राहिल्यावर प्रादेशिक नेते काँग्रेसला ही यात्रा यशस्वी करण्यासाठी कितपत मदत करतील??, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही!!
*ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमार्गे महाराष्ट्रात संपेल. यापैकी नागालँड मेघालय सोडली, तर बाकी सगळी राज्ये ही मोठी मानली जातात. यापैकी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सरकारे आहेत. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणामूळ काँग्रेसचे सरकार, बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जदयू आणि लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार, झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार, तर ओडिशात नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचे सरकार आहे.*
यापैकी ममता बॅनर्जी, नितीश कुमार लालूप्रसाद हे आज जरी काँग्रेस प्रणित INDI आघाडीत असले, तरी ते आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसला कितपत मान आणि डोके वर काढून देतील??, हा प्रश्नच आहे. त्यातही ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार हे तर काँग्रेसची विशेष खुन्नसच राखून आहेत. अशा वेळी राहुल गांधींची न्याय यात्रा जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणारी वाटत असली, तरी प्रत्यक्षात वर उल्लेख केलेल्या 4 राज्यांमध्ये ती प्रादेशिक पक्षांच्या सरकारांनाच आव्हान देणारी ठरणार आहे. त्यामुळे एक प्रकारे INDI आघाडीतच पाचर बसणार आहे.
ओडिशात नवीन पटनाईक हे काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही पक्षांपासून विशिष्ट अंतर राखून आहेत. त्यातही ओडिशा काँग्रेस प्रबळ विरोधी पक्ष असल्याने आणि केंद्रात सध्या भाजपचे सरकार असल्याने नवीन पटनायकांचे पंतप्रधान मोदींची स्वतंत्र इक्वेशन आहे. त्या उलट ते काँग्रेसला ओडिशात आपल्या आसपास फडकूही देत नाहीत. अशा स्थितीत राहुल गांधी या प्रादेशिक पक्षांच्या राजवटी असलेल्या राज्यांमध्ये न्याय यात्रा काढून नेमके काय करणार??, हा कळीचा सवाल आहे.
त्यानंतर राहुल गांधी उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान मार्गे महाराष्ट्रात येणार आहेत. ही सगळी राज्य राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने स्वतःच्या हाताने गमावली आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे काहीही अस्तित्व नाही. तिथे पक्षाचे फक्त 2 खासदार आहेत आणि आता प्रियांका गांधी देखील उत्तर प्रदेश या प्रभारी उरलेल्या नाहीत. त्यामुळे राहुल गांधींच्या न्याय यात्रेच्या यशस्वीतेची उत्तर प्रदेशातली जबाबदारी गांधी नसलेल्याच कुठल्यातरी नेत्याला खेचून न्यावी लागणार आहे. बाकीच्या राज्यांमध्येही फारशी वेगळी परिस्थिती नाही. अशावेळी राहुल गांधी 6200 किलोमीटर चालणार म्हणजे फार मोठा पल्ला गाठणार हे निश्चित, पण त्यातून राजकीय लाभाचा नेमका किती पल्ला गाठणार??, हा मूलभूत आणि गंभीर प्रश्न आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत भारत जोडो यात्रा काढली होती. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेला १४५ दिवसांचा हा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपला. त्यानंतर राहुल यांनी 3570 किलोमीटरच्या प्रवासात 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश कव्हर केली. प्रत्यक्ष निवडणूक निकालात त्याचे प्रतिबिंब कर्नाटक आणि तेलंगणात दिसले. कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसने सत्ता मिळवली, तर तेलंगणात भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांचा पक्षाचा पराभव करून काँग्रेस सत्तेवर आली, पण त्या पलीकडे जाऊन पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मणिपूर या राज्यांमध्ये मात्र काँग्रेसने सत्ता गमावली.
त्यामुळे राहुल गांधी पूर्व-पश्चिम 6200 किलोमीटर चालणार तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करणार, पण आव्हान नेमके कोणाला देणार??, हा सवाल तयार झाला आहे. कारण राहुल गांधीच्या राज्यांमधून प्रवास करणार आहेत तिथे तर प्रामुख्याने भाजप पेक्षा अन्य प्रादेशिक पक्षांची सरकारेच बळकट आहेत, मग राहुल गांधी मोदींवर तोंडी तोफा डागून प्रत्यक्षात प्रादेशिक पक्षांच्या सरकारांना हादरा देण्याचे काम करणार, हे भारत या यात्रेचे खरे राजकीय इंगित आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App