आता नितीश कुमारच निर्णय घेतील
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दल युनायटेड (JDU) ला मोठा झटका बसला आहे. ललन सिंह यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे.Big blow to JDU before Lok Sabha elections Lalan Singh resigns from the post of president
त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सुपूर्द केला आहे, मात्र याबाबत पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र २९ डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय किंवा घोषणा होणार आहे.
नितीश कुमार यांच्या उपस्थितीत २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत ललन सिंह यापुढे पक्षाध्यक्षपद भूषवणार नाहीत यावर एकमत झाले, तर ती एक मोठी राजकीय घडामोड ठरेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App