दिल्ली मद्य धोरण प्रकरणी, ED कडून केजरीवाल यांना पुन्हा नोटीस!

  • २१ डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने त्यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणी २१ डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.Delhi liquor policy case, ED again notice to Kejriwal

यापूर्वी २ नोव्हेंबरला ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती, मात्र त्यांनी ही नोटीस बेकायदेशीर ठरवून मागे घेण्याची मागणी केली होती.



माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. इतर आरोपींच्या चौकशीच्या आधारे ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे.

‘आप’ने मागच्या नोटिसीवर काय म्हटले होते?

आम आदमी पार्टी (आप) दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी आपल्या नेत्यांवरील कारवाईला राजकीय षडयंत्र म्हणत आहे. ‘आप’चे म्हणणे आहे की, भाजप राजकीय सूडासाठी पक्ष नष्ट करू इच्छित आहे. गेल्या वेळी जेव्हा ईडीने सीएम केजरीवाल यांना नोटीस पाठवली होती, तेव्हा आम आदमी पार्टीने त्यांना तुरुंगात पाठवण्याचा कट रचल्याचे म्हटले होते.

Delhi liquor policy case, ED again notice to Kejriwal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात