हा अहवाल 1500 पेक्षा जास्त पानांचा आहे. ज्यामध्ये 250 हून अधिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : प्रदीर्घ कालावधीनंतर एएसआय (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) यांनी अखेर सोमवारी वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणात सर्वेक्षण अहवाल सादर केला.ASI submits survey report to court in Gyanvapi case decision to be taken on 21st December
एएसआयच्या अतिरिक्त संचालकांनी वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांना सीलबंद अहवाल सादर केला आहे. हा अहवाल 1500 पेक्षा जास्त पानांचा आहे. ज्यामध्ये 250 हून अधिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.
एएसआयने वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए के विश्वेश यांच्यासमोर अहवाल सादर केला आहे. अहवाल सार्वजनिक करावा, असे हिंदू बाजूच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले. हिंदू बाजूने अहवालाच्या प्रती प्रदान करण्यासाठी सहभागी सर्व पक्षांना निर्देश मागितले.
मुस्लिम पक्ष याला विरोध करत आहे. ती सार्वजनिक क्षेत्रात आणू नये, असे मुस्लिम बाजूचे म्हणणे आहे. आता याबाबतचा निर्णय २१ डिसेंबरला येणार आहे. सर्वेक्षण अहवालाची प्रत २१डिसेंबरलाच पक्षकारांना दिली जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App