विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकेकाळी बीमारू राज्य म्हणून गणला गेलेला उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली देशात नंबर 2 बनला आहे. GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीत उत्तर प्रदेशाने तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ या प्रगत राज्यांनाही मागे टाकून दुसऱ्या नंबर वर झेप घेतली आहे. GDP मध्ये अर्थातच महाराष्ट्रात पहिल्या नंबर वर आहे. With 9.2% share in India’s GDP, UP 2nd largest economy
पण एकेकाळी उत्तर प्रदेशचा GDP मध्ये क्रमांक 14 व्या स्थानावर असायचा उत्तर प्रदेश आणि बिहार आणि त्यानंतर झारखंड ही देशातली बीमारू म्हणजे आजारी राज्ये आहेत, असे हिणवले जायचे उत्तर प्रदेश म्हणजे अराजकता, जातिवाद, माफियागिरी, गुंडागर्दी, अस्वच्छता आणि असुविधा हे समीकरण स्वातंत्र्यानंतर तब्बल 60 – 65 वर्षांपर्यंत बनून राहिले होते. प्रगतीच्या कोणत्याही निकषांवर उत्तर प्रदेश कोणत्याच वरच्या स्थानावर नव्हता. देशातल्या दक्षिणेतल्या राज्यांनी कर रूपाने तिजोरी भरायची आणि उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांनी अनुदान आणि सवलतीच्या रूपात ती तिजोरी रिकामी करायची असे त्याकाळी या राज्यांना हिणवले जात होते. पण आता त्या हिणकस बोलण्यातून उत्तर प्रदेशाने स्वतःला बाहेर काढून तामिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगाल सारख्या प्रगत राज्यांना GDP पिछाडीवर टाकले आहे.
उत्तर प्रदेशाचा GDP 9.2 % पोचला असून तामिळनाडू 9.1 %, गुजरात 8.2 % आणि पश्चिम बंगाल 7.5 % अशी सध्या आकडेवारी आहे. महाराष्ट्राने मात्र या सर्व राज्यांना मागे टाकून आपला GDP 15.7 % एवढा अव्वल राखला आहे.
”काँग्रेसला अयोध्येत राम मंदिर बांधायचे नव्हते’, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र!
उत्तर प्रदेशात अयोध्येचे राम मंदिर उभे राहिले आहे. अयोध्येसह संपूर्ण राज्यात पायाभूत सुविधांची प्रचंड कामे उभी राहत आहेत. योगी सरकारने गुंड माफियांवर बुलडोझर चालवून उत्तर प्रदेशातली कायदा सुव्यवस्था उत्तम केली आहे. उत्तर प्रदेश म्हणजे माफियागिरी – गुंडागर्दी हे समीकरण बुलडोझर बाबांनी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकले आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशात देशांतर्गत आणि परकी गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे.
उत्तर प्रदेशात आत्ता तब्बल 40 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव अथवा प्रत्यक्षात कामे सुरू आहेत. अयोध्येत श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्णत्वाला पोहोचले आहे, तसेच एकट्या अयोध्येत 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल बांधण्याचे तब्बल 2 डझन प्रस्ताव आल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून उत्तर प्रदेशाने आपली बीमारू राज्य ही प्रतिमा पुसून टाकून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजेच GDP मध्ये 9.2 % भर घालणारे प्रगत राज्य म्हणून आपली नवी प्रतिमा निर्माण केली आहे.
उत्तर प्रदेशातला वार्षिक निर्यात दोन लाख कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे बँक लोन डिपॉझिट रेशो 42 – 43 % वरून 56 % वर पोहोचला आहे. महसुली उत्पन्न सरप्लस झाले आहे, तसेच राज्यामध्ये 96 लाख एमएसएमई सुरू आहेत. उत्तर प्रदेशाचा “आर्थिक आजार” संपला आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App