विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या बुद्धिस्ट डिस्टिलरीज कंपन्यांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 351 कोटी रुपयांच्या नोटा आढळून आल्या. देशातल्या भ्रष्टाचाराचा इतिहासात प्रथमच एवढी मोठी रोकड आढळून आली आहे. What is the need for a different Money Heist fiction when there is Congress in the country
या पार्श्वभूमीवर भाजपने चोरी दरोडेखोरीवर आधारित स्पॅनिश वेब सिरीज Money Heist वर आधारित एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे. तोच व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करून आपल्या देशात काँग्रेस सारखा पक्ष असताना आणि त्याचे लुटेरे, दरोडेखोर गेली 70 वर्षे देश लुटत असताना आपल्याला MoneyHeist सारखी दुसरी फिक्शन पाहण्याची गरजच काय??, असा टोला मोदींनी काँग्रेसला हाणला आहे.
In India, who needs 'Money Heist' fiction, when you have the Congress Party, whose heists are legendary for 70 years and counting! https://t.co/J70MCA5lcG — Narendra Modi (@narendramodi) December 12, 2023
In India, who needs 'Money Heist' fiction, when you have the Congress Party, whose heists are legendary for 70 years and counting! https://t.co/J70MCA5lcG
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2023
– Money Heist आहे काय?
मूळ स्पॅनिश कलाकृती असलेल्या ‘ल् कॅसा दे पापेल’ या मालिकेला नेटफ्लिक्सने जगभरातील प्रेक्षकांच्या दृष्टीने सोयीस्कर असं ‘मनी हाइस्ट’ नाव दिले. ‘हाइस्ट’ म्हणजेच दरोड्याभोवती फिरणारी होती.
‘मनी हाइस्ट’च्या पहिल्या सीजनचं कथानक घडण्याचा काळ आहे २००८चा. त्यावर्षीच्या आर्थिक मंदीचा नकारात्मक परिणाम हा वैश्विक पातळीवर दिसून आला होता. साहजिकच स्पेनमधील अर्थव्यवस्थादेखील या संकटापासून बचावली नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रोफेसर (अल्वारो मॉर्ते) हे नाव धारण केलेली व्यक्ती काही गुन्हेगारांना एकत्र आणते. या गुन्हेगारांचं नेतृत्व करत ‘रॉयल मिंट ऑफ स्पेन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टांकसाळीत दरोडा घालण्याची योजना प्रोफेसरने आखलेली असते. मालिकेच्या पहिल्या सीजनचं सगळं कथानक याच मोहिमेभोवती फिरतं आणि इथेच साल्वादोर दालीचे मुखवटे घातलेले, अंगभर लाल पोशाख परिधान केलेले दरोडेखोर पहिल्यांदा पाहायला मिळाले.
घटनाक्रमाची मांडणी उलटसुलट असल्याने मालिकेला सुरुवात होते, तेव्हा प्रत्यक्ष दरोड्याला सुरुवात झालेली असते. प्रोफेसर वगळता सगळी टोळी टाकसाळीत पोचलेली असते आणि तो बाहेर राहून त्यांना मदत करत सगळी योजना ठरल्याप्रमाणे पार पडेल यासाठी कार्यरत असतो. प्रोफेसरची योजना इतक्या मोठ्या स्तरावरील असते, की त्याची टोळी जवळपास सत्तर लोकांना कैद करून त्यांच्यासमवेत जवळपास 11 दिवस टाकसाळीत थांबणार असते. मधल्या काळात त्यांनी दिवसरात्र नोटा छापत जवळपास 2.5 अब्ज डॉलर्स इतकी रक्कम लंपास करणं अपेक्षित असतं. प्रत्यक्ष दरोड्याचा कालावधी हा इतका मोठा असल्याने, या सगळ्या गणितात पोलिस यंत्रणा येते. असते. त पोलिस इन्स्पेक्टर राकेल मरिलोच्या (इत्झियर इत्युनो) निमित्ताने इमारतीच्या आतील टोळी आणि बाहेरून मदत करणारा प्रोफेसर या दोन दृष्टिकोनांखेरीज पोलिसांची बाजूही अगदी सविस्तरपणे समोर येते.
काँग्रेसमधल्या ‘मनी हाइस्ट’मधील आत्ता एकच पात्र समोर आले आहे. अशी अजून अनेक पात्रे समाजात वावरत असली तरी ती अजून उघड झालेली नाहीत. पण ती लवकरच उघड होतील आणि समाजासमोर त्यांचा विद्रूप आणि विकृत चेहरा चेहऱ्याचा भांडाफोड होईल, असेच मोदींनी या ट्वीट मधून सूचित केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App