इराक विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग ; १४ जणांचा मृत्यू, १८ जणांची प्रकृती गंभीर

  • सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

विशेष प्रतिनिधी

इराकच्या उत्तरेकडील शहर एरबिलमधील विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (८ डिसेंबर) सायंकाळी घडली.Huge fire at the dormitory of the University of Iraq 14 people died 18 people are in critical condition



 

सोरानच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, एरबिलच्या पूर्वेकडील सोरान या छोट्या शहरातील एका इमारतीत आग लागली. सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. स्थानिक वृत्तसंस्थेने सांगितले की, शुक्रवारी रात्री उशीरा आग विझवण्यात आली.

एवढी भीषण आग नेमकी कशामुळे लागली त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमागची कारणे तपासली जात आहेत. या अपघातात १८ विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेने सोरान विद्यापीठातील सर्व शिक्षक व विद्यार्थी दुखावले आहेत.

Huge fire at the dormitory of the University of Iraq 14 people died 18 people are in critical condition

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात