G-20:पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज G-20 व्हर्च्युअल परिषद; रशियाचे राष्ट्रपती आणि चीनचे पंतप्रधानही सहभागी होणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग बुधवारी भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या व्हर्च्युअलG-20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. G-20 वर्च्युअल शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबरमध्ये झालेल्या समूहाच्या वार्षिक शिखर परिषदेत ठरलेल्या परिणामांवर आणि कृतीच्या मुद्द्यांवर आधारित असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीत सांगितले. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आणि इस्रायल-हमास संघर्ष यावरही चर्चा होणार आहे.G-20 virtual conference chaired by PM Modi today; The President of Russia and the Prime Minister of China will also participate

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 नेत्यांच्या डिजिटल शिखर परिषदेचे आयोजन करण्याच्या एक दिवस आधी, भारताने मंगळवारी सांगितले की, दिल्ली घोषणेच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी, महत्त्वाच्या आव्हानांवर सहकार्य वाढवण्यासाठी आणि जागतिक प्रशासनातील त्रुटी दूर करण्यासाठी ही बैठक आयोजित केली जाईल.



शिखर परिषदेच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना भारताचे G-20 शेर्पा अमिताभ कांत म्हणाले की 9 आणि 10 सप्टेंबर रोजी शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. नवी दिल्ली जाहीरनामा एकमताने स्वीकारल्यापासून जगाने एकापाठोपाठ एक अशा अनेक घटना पाहिल्या आहेत आणि अनेक नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.

या बैठकीचा मुख्य अजेंडा विकास हा असेल, तर इतरही अनेक मुद्द्यांवर नेते चर्चा करू शकतात, असे ते म्हणाले. ते म्हणाले, “ही डिजिटल समिट केवळ घोषणांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्याची संधी देणार नाही, तर नेत्यांना आपल्यासमोर असलेल्या गंभीर आव्हानांवर विचार शेअर करण्याची आणि सहकार्य वाढवण्याची संधीही देईल. बुधवारी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होणाऱ्या या शिखर परिषदेचे अध्यक्षपद पंतप्रधान घेतील, असे कांत यांनी सांगितले.

G-20 virtual conference chaired by PM Modi today; The President of Russia and the Prime Minister of China will also participate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात