जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश ; कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार, ५ जणांना घेरले

  • सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असून त्यापैकी तीन जण ठार झाले आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे.Armys big success in Jammu and Kashmir 3 terrorists killed 5 surrounded in Kulgam encounter

या अगोदर उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत दहशतवादी लाँच कमांडर बशीर अहमद मलिकसह दोन दहशतवादी मारले गेले होते.



याशिवाय घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि पाकिस्तानी रोकड जप्त करण्यात आली आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये पोलिस आणि सुरक्षा एजन्सीकडून मिळालेल्या विशिष्ट इनपुटवर दक्षता आणखी वाढवण्यात आली आहे. बुधवारी, खराब हवामानात, नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांना सीमेवरून दहशतवादी येताना दिसले. त्यांनी त्याला आव्हान दिल्यावर चकमक सुरू झाली. यादरम्यान दोन दहशतवादी मारले गेले. घटनास्थळी शोधमोहीम राबवण्यात आली.

बशीर अहमद मलिक आणि अहमद गनी शेख अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोन्ही घुसखोर पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील रहिवासी होते. दहशतवादी बशीर हा लॉन्च कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे. बशीरने नियंत्रण रेषेपलीकडून अनेक वेळा दहशतवाद्यांची घुसखोरी केली होती. यावेळी तो सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मारला गेला.

Armys big success in Jammu and Kashmir 3 terrorists killed 5 surrounded in Kulgam encounter

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात