विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना सदस्यत्व गमवावे लागू शकते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संसदीय आचार समितीने महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे. Cash For Query Ethics Committee recommends cancellation of Lok Sabha membership of Mahua Moitra
त्याच वेळी, लाचलुचपत प्रतिबंधक पॅनेलने याच प्रकरणात महुआ मोईत्रा विरुद्ध सीबीआय तपासाचे आदेश दिल्याचा दावा केला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर हा दावा केला आहे. दरम्यान, महुआ यांच्यावरील आरोपांच्या मसुद्याच्या अहवालावर विचार करण्यासाठी आचार समितीची आज (९ नोव्हेंबर) बैठक होणार आहे. समितीने गुरुवारी दुपारी चार वाजता महुआ यांना बोलावले आहे.
लाचखोरीची चौकशी करणाऱ्या आचार समितीतून महुआ मोईत्रांचा संतापाने सभात्याग की मूळ प्रश्नांपासून पलायन??
आचार समितीने आपल्या शिफारशीत राष्ट्रीय सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा आधार बनवला आहे. आपल्या शिफारशीत समितीने म्हटले आहे की महुआ मोईत्रा यांनी त्यांच्या संसदीय अकाउंटचे लॉग-इन तपशील अनधिकृत व्यक्तींसोबत शेअर केले आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होतो. समितीने हा गंभीर गुन्हा मानला असून त्यामुळे महुआ मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व बडतर्फ करण्याची शिफारस केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App