प्रतिनिधी
मुंबई : दिवाळी निमित्ताने खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो. नवी मुंबई येथील सिडको प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 50000 रुपयांचा दिवाळी बोनस दिला आहे. बोनस जाहीर झाल्यानंतर सिडको कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, पेढे वाढून आनंद साजरा केला. CIDCO employees’ Diwali blast this year; Rs 50000 bonus
महामंडळांमध्ये सर्वाधिक बोनस
महामंडळांमध्ये हा सर्वाधिक बोनस असून सिडकोच्या या निर्णयाचे सिडको कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे. सिडको प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्व सिडको कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असून सिडको कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केलाय.
ठाणे महानगरपालिकेचा 21,500 रुपयांचा बोनस
ठाणे महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये भरघोस 20 % वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 18000 रुपये बोनस दिला होता, तर या वर्षी यामध्ये 20 % वाढ झाली असून 21,500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16,500 रुपये बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18,500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App