Mahadev Betting App: ‘मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आहेत, तिथे तुम्हीही…’ ; अनुराग ठाकूर यांचा मुख्यमंत्री बघेल यांच्यावर हल्लाबोल!

  • छत्तीसगडमधील महादेव अॅप सट्टेबाजी प्रकऱणावरून साधला आहे निशाणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये आज (मंगळवारी) २० जागांसाठी मतदान होत आहे. दुसरीकडे, महादेव अॅप आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईनंतर भाजप मुख्यमंत्री बघेल यांच्यावर सातत्याने टीका करत आहे.Union Minister Anurag Thakur criticizes Chief Minister Bhupesh Baghel over Mahadev app betting case in Chhattisgarh

अगदी पंतप्रधान मोदींपासून ते भाजपचे सर्व बडे नेते या प्रकरणी मुख्यमंत्री बघेल यांना कोंडीत पकडत आहेत. त्याच क्रमाने आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही महादेव अॅप प्रकरणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.



केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “देशातील 75 वर्षांच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे असे एक असे उदाहरण आहे, की ज्यांनी एक नाही तर अनेक भ्रष्टाचार केले आहेत. त्यांच्या सरकारमध्ये गोठण घोटाळा, कोळसा घोटाळा, मद्य घोटाळा, पेपर लीक घोटाळा आणि आता महादेव अॅप घोटाळा झाला आहे.’’

त्यांचे सरकार घोटाळ्यांवर घोटाळे करत आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणतात घोटाळा करा, भ्रष्टाचार करा आणि ‘भूपे’ म्हणजे मुख्यमंत्र्यांना पैसे द्या. भूपेश बघेल यांनी महादेव अॅपवरून 508 कोटी रुपये घेतले .

अनुराग ठाकूर म्हणाले की, आता प्रश्न असा येतो की मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हे अॅप का ब्लॉक केले नाही? त्यांनी अॅप ब्लॉक करण्यासाठी पत्र लिहिलं होतं का? यावरून ते अॅप डेव्हलपर्सशी सट्टेबाजी करून पैसे कमवत असल्याचे स्पष्ट होते. एवढेच नाही तर सत्तेत येण्यासाठी या सट्टेबाजीचा पैसा वापरत होते. आता सत्य समोर आल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल प्रश्नांची उत्तरे देत नाहीत.

अनुराग ठाकूर म्हणाले, “मुख्यमंत्री भूपेश प्रश्नांपासून किती पळून जातील? आता छत्तीसगड म्हणत आहे, ‘भाग भूपेश भाग’, भूपेश बघेल तुम्ही जितके पळून जाल, तितकी जनता तुमच्या मागे लागणार. मग एजन्सी तुम्हाला पकडून आणतील. जिथे मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आहेत आणि अरविंद केजरीवाल असणार आहेत, तिथे तुम्हालाही जागा मिळेल.”

Union Minister Anurag Thakur criticizes Chief Minister Bhupesh Baghel over Mahadev app betting case in Chhattisgarh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात