छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी घडवून आणला IED स्फोट!

  • केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक जखमी झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : छत्तीसगढ़मध्ये आज निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान होत आहे. यावेळी नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातही मतदानाबाबत प्रचंड उत्साह आहे. मतदानासाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत छत्तीसगडमध्ये ९.९३ टक्के मतदान झाले.In Chhattisgarh on election day Naxalists made IED blast

मात्र मतदानादरम्यान सुकमा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक निरीक्षक जखमी झाले आहेत. राज्यातील नक्षलग्रस्त बस्तर क्षेत्रासह २० विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.



पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील तोंडामार्का कॅम्प अंतर्गत एलमागुंडा गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला, ज्यामध्ये सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचे निरीक्षक श्रीकांत जखमी झाले. ते म्हणाले की, आज सकाळी मतदानाच्या सुरक्षेसाठी कोब्रा 206 आणि सीआरपीएफचे जवान तोंडमर्का येथून एलमागुंडा गावाकडे निघाले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गस्तीदरम्यान कोब्रा 206 चे निरीक्षक श्रीकांत यांच नक्षलवाद्यांनी टाकलेल्या भूसुरुंगावर पाऊल पडल्याने, स्फोट झाला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

In Chhattisgarh on election day Naxalists made IED blast

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात