जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर येते तेव्हा देशात दहशतवादी आणि नक्षलवाद्यांची हिंमत वाढते, असंही मोदी म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

सूरजपूर : एकीकडे छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी मतदान सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरजपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करत आहेत. सुरजपूर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडची निर्मिती भाजपने केली होती आणि म्हणूनच आज संपूर्ण छत्तीसगड म्हणत आहे की, ‘भाजपने निर्माण केले आहे, भाजपाच सांभाळेल.Congress has given Chhattisgarh nothing but betrayal PM Modi

मोदी म्हणाले की, आज छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. मोठ्या उत्साहात मतदान होत आहे. माझे सर्व मतदारांना आवाहन आहे की, न घाबरता, न डगमगता मतदान करा.



सूरजपूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर येते तेव्हा देशात दहशतवादी आणि नक्षलवाद्यांची हिंमत वाढते. ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता असते, त्या प्रत्येक राज्यात गुन्हेगारी आणि लूटमार सुरूच असते. काँग्रेस सरकार नक्षल हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे…”

याशिवाय मोदी म्हणाले की, ‘’एका बाजूला भाजपचे ठराव पत्र आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचा खोटारडेपणाचा धंदा आहे. काँग्रेसने तुम्हा सर्वांना विश्वासघाताशिवाय काहीही दिलेले नाही. काँग्रेसने छत्तीसगडच्या तरुणांची स्वप्नेही पूर्ण केली नाहीत. महादेवाच्या नावाने घोटाळाही केला. महादेव सट्टेबाजी घोटाळ्याची आज देश-विदेशात चर्चा होत आहे. काँग्रेसने आपली तिजोरी भरण्यासाठी तुमच्या मुलांना बेटिंग करायला लावले आहे. ..”

Congress has given Chhattisgarh nothing but betrayal PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात