हिंसेमुळे मराठा आंदोलनाची बदनामी; कायदा हातात घेऊ नये; जरांगेनी उपोषण मागे घ्यावे; सर्वपक्षीय बैठकीत आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्या तरी महाराष्ट्रात हिंसाचारामुळे मराठा आंदोलनाची बदनामी होत आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. मराठा आरक्षण देण्याची सर्वच पक्षांची भूमिका आहे, पण त्यासाठी वेळ लागेलह सर्व कायदेशीर चौकटी पूर्ण कराव्या लागतील. त्यासाठी सरकारला वेळ द्यावा. मनोज जरंगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन सर्वपक्षीय बैठकीत आज सर्व नेत्यांनी केले.Maratha agitation discredited by violence; Don’t take the law into your hands; Jarange should call off his fast; Call for All-Party Meeting

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दरम्यान राज्यात बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्था आणि मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीयांचे एकमत झाले, तर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले.



मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ज्या काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. यामुळे थोडा संयम बाळगावा आणि सरकारला वेळ द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

या सर्वपक्षीय बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनिल प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ. प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे, आदी उपस्थित आहेत. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Maratha agitation discredited by violence; Don’t take the law into your hands; Jarange should call off his fast; Call for All-Party Meeting

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात