प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या गाडीची मुंबईतील आमदार निवासात मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाली. आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.Hasan Mushrif’s car vandalized; Violent incidents will end the Maratha agitation, sympathy; Mushrif’s statement
माझ्या गाडीची तोडफोड झाली. पण या प्रकरणी कारवाई करू नये, असं मी गृहखात्याला सांगणार आहे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलनाला नेतृत्व दिसत नाही. या तरूणांना समजावून सांगावे. आंदोलन कसे असावे हे सांगावे, असे नेतृत्व नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
एकमेकांचे स्थानिक विरोधक असतात. ते टार्गेट करून तेच विरोधक अशा घटना घडवून आणत आहेत की काय? अशी निर्माण होत आहे. आमदार स्वत:ची घरं जाळतील, गाड्या जाळतील असं होईल का? त्यामुळे या घटना कोण घडवून आणतंय ते बघणं गरजेचं आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
आमदारांची घरं जाळणं. त्यांचं कुटुंब घरात असताना दगडफेक करणं, हे अत्यंत दुदैवी आहे. अशा घटना घडता कामा नयेत. या अशा घटनांमुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे. लोकांची जी सहानुभूती या आंदोलनाला आहे. ती देखील निघून जातेय. याचा देखील या आंदोलकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता वारंवार बैठका होत आहेत. चर्चा होत आहेत. आजही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी बोलावली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
मुंबईतील आमदार निवासस्थानी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तीन मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली आहे. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या तोडफोडीच्या घटनेनंतर हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईतील तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App