अमेरिकेच्या क्लॉडिया गोल्डिन यांना मिळाले अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक

२०२३ मध्ये नोबेल पुरस्कार पटकावणारी क्लॉडिया गोल्डिन या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारात आणखी एका नावाची भर पडली आहे. आल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ आर्थिक विज्ञान क्षेत्रातील Sveriges Riksbank पुरस्कार 2023 क्लॉडिया गोल्डिन यांना प्रदान करण्यात आला आहे. American Claudia Goldin won the Nobel Prize in Economics

क्लॉडिया अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील संशोधन आणि त्यांच्या ऐतिहासिक कार्यासाठी ओळखल्या जातात. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका क्लॉडिया गोल्डिन यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या संदर्भात द नोबेल प्राईजने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की, “रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने  ‘महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामांबद्दलची आमची समज विकसित केल्याबद्दल ‘ क्लॉडिया गोल्डिन यांना आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ  आर्थिक विज्ञान क्षेत्रातील Sveriges Riksbank पुरस्कार 2023 देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

American Claudia Goldin won the Nobel Prize in Economics

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात