विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ असे म्हणत महाराष्ट्रात टोल नाक्यांवरून घमासान सुरू केले. आम्ही टोलनाके जाळून टाकू, अशा धमक्या दिल्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये ते मुख्यमंत्री असताना नेमके काय केले??, या संदर्भात स्पष्ट खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातले नेमके किती टोलनाके बंद केले?? आणि किती टोल नाक्यांवर कोणकोणत्या वाहनांना सवलती दिल्या??, याचा स्पष्ट खुलासा केला आहे.Raj Thackeray’s threat to burn toll booths; But how many toll noses closed?? And discounts at how many places??, read Fadnavis’ clear disclosure!!
राज ठाकरेंनी आज मुंबईत अचानक पत्रकार परिषद घेऊन टोलनाके जाळण्याची भाषा केली. लहान आणि मध्यम वाहनांना टोल माफ केला असताना अजूनही टोल वसुली होते. त्यामुळे इथून पुढे जर कोणी टोल वसुली केली, तर आम्ही टोल नाके जाळून टाकू, अशी धमकी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यानंतर ताबडतोब मनसेचे कार्यकर्ते मुंबईतल्या 5 टोल नाक्यांवर पोहोचले. त्यांनी तिथे लहान – मध्यम वाहने टोल न घेताच सोडून द्यायला लावली. टोल नाक्यांवरच्या कर्मचाऱ्यांची आणि पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांशी झटापट झाली. ठाण्यामध्ये देखील मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्ते काही टोल नाक्यांवर पोहोचले आणि त्यांनी तिथे वाहने सोडून दिली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यामुळे महाराष्ट्रात दोन विरोधी आंदोलन पेट घेताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने स्पष्ट खुलासा केला आहे. तो असा :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील टोलमाफीसंदर्भात एक विधान केले होते. त्याबाबत माध्यमांमधून नेमक्या निर्णयासंदर्भात विचारणा होते आहे.
त्याबाबतची माहिती अशी :
1) 31 मे 2015 रोजी मध्यरात्री 12 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 38 पथकर स्थानकांपैकी 11 पथकर स्थानकांवरील आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 53 पैकी 1 पथकर स्थानकावरील अशा एकूण 12 पथकर नाक्यांवरील पथकर वसुली बंद करण्यात आली.
2) सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित 27 पथकर स्थानके तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 26 पथकर स्थानकावरील अशा एकूण 53 पथकर स्थानकांवरील कार, जीप आणि एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना 31 मे 2015 रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून पथकरातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुद्धा 2017 मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचा जीआर सुद्धा 31 ऑगस्ट 2017 रोजी जारी करण्यात आला.
या स्पष्ट खुलाशाबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने एक निवेदनही जारी केले. महाराष्ट्रात टोल विरोधी आंदोलन पेट घेत असताना उपमुख्यमंत्र्यांचे निवेदन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App