पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांनी भगवंत मान सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.
विशेष प्रतिनिधी
चंडीगढ : पंजाब पोलिसांनी काँग्रेसचे आमदार सुखपाल खैरा यांना अमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात अटक केली आहे. न्यायालयाने सुखपाल सिंह खैरा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पंजाब पोलिसांनी खैरा यांना गुरुवारी सकाळी अटक केली ते प्रकरण २०१५ चे आहे.दरम्यान पंजाब काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने पक्षाचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याच्या संदर्भात पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. तर या अटकेवरून आता काँग्रेसने आम आदमी पार्टी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. Clash between Aam Aadmi Party and Congress in Punjab after the arrest of MLA Sukhpal Khaira
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांनी पंजाबच्या भगवंत मान सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. राजा वाडिंग म्हणाले- ‘आम्ही राज्यपालांना सुखपाल सिंह खैरा यांच्याबाबत काय घडले याची माहिती दिली. खोटा गुन्हा कसा दाखल झाला. पंजाबमध्ये जंगलराज कसे सुरू झाले आहे. कसे सूडाचे राजकारण होत आहे हे सांगितले.
काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना पंजाब पोलिसांनी केली अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांनी आरोप केला आहे की, ‘सुखपाल सिंह खैरा यांना ८ वर्षे जुन्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यांना आठ वर्षे जुन्या प्रकरणात गोवून सुडाचे राजकारण केले जात आहे. षडयंत्र रचले गेले आणि खैरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पकडण्यासाठी पोलीस लगेच आले. आम्ही गप्प बसणार नाही. न्यायासाठी शेवटपर्यंत लढत राहणार. लोकांना सत्य माहीत आहे. राज्यपाल याची दखल घेतील अशी आशा आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App